मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एमजी मोटर इंडियाने आज नवीन जागतिक स्तरावर यशस्वी ठरलेली झेडएस ईव्हीच्या लाँचची घोषणा केली. नवीन झेडएस ईव्हीमध्ये विभागातील सर्वात मोठी ५०.३ केडब्ल्यूएच बॅटरीसह प्रगत तंत्रज्ञान आहे, जे एका चार्जमध्ये ४६१ किमी प्रमाणित रेंज देते. नवीन झेडएस ईव्ही २ व्हेरिएण्ट्समध्ये (एक्साईट व एक्सक्लुसिव्ह) उपलब्ध असेल, ज्यांची किंमत अनुक्रमे २१,९९,८००/- रूपये व २५,८८,०००/- रूपये आहे. एक्लक्लुसिव्ह व्हेरिएण्टसाठी बुकिंग्ज आजपासून सुरू होत आहे, तर एक्साईट व्हेरिएण्टसाठी बुकिंग्ज जुलै २०२२ पासून सुरू होतील.
नवीन झेडएस ईव्हीमध्ये आकर्षक एक्स्टीरिअर डिझाइन घटक, आरामदायी व प्रिमिअम इंटीरिअर, विभागातील प्रथम वैशिष्ट्ये जसे ड्युअल पेन पॅनोरॅमिक स्कायरूफ, डिजिटल ब्ल्यूटूथ® की, रिअर ड्राइव्ह असिस्ट, ३६० ० कॅमेरा, आय-स्मार्टसह ७५ हून अधिक कनेक्टेड कार वैशिष्ट्ये, हिल डिसेण्ट कंट्रोल अशा सर्वोत्तम वैशिष्ट्यांची भर करण्यात आली आहे. तसेच या वेईकलमध्ये जागतिक स्तरावर प्रमाणित (एएसआयएल-डी, आयपी६९के व यूएल२५८०) बॅटरी आहे, जिने आग, अपघात, धूळ, धूर इत्यादी संदर्भात ८ स्पेशल सेफ्टी चाचण्या पार केल्या आहेत. ही कार फेरिस व्हाइट, करण्ट रेड, अॅशेन सिल्व्हर आणि सेबल ब्लॅक या ४ एक्स्टीरिअर रंगाच्या व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध आहे.
एमजी मोटर इंडियाचे एमजी मोटार इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले, “लाँच केल्यापासून झेडएस ईव्हीसाठी मागणी प्रेरणादायी राहिली आहे आणि नवीन झेडएस ईव्ही आमच्या ईव्ही ग्राहकांसोबतचे ब्रॅण्ड संबंध अधिक दृढ करेल. झेडएस ईव्ही युके, युरोप व ऑस्ट्रेलियासह प्रमुख बाजारपेठांमध्ये जागतिक स्तरावर यशस्वी ठरली आहे. भारतातील भावी इलेक्ट्रिक मोबिलिटीप्रती कटिबद्ध राहत आम्ही प्रबळ व स्थिर ईव्ही परिसंम्ही निर्माण करण्याच्या माध्यमातून उच्च दर्जाच्या मालकीहक्क अनुभवाची खात्री घेतो. नवीन झेडएस ईव्हीसह आम्हाला मानसिकतेमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा आणि भारतामध्ये ईव्ही अवलंबतेला चालना मिळण्याचा विश्वास आहे.”
आकर्षक एक्स्टीरिअर डिझाइन: नवीन झेडएस ईव्हीमध्ये एमजीची सिग्नेचर जागतिक डिझाइन शैली असण्यासोबत न्यू इलेक्ट्रिक डिझाइन ग्रिल व १७ इंच टोमाहॉक हब डिझाइन अलॉई व्हील्स आहेत, ज्यामधून उच्च दर्जाच्या ऐरोडायनॅमिक्ससोबत आधुनिक लुक मिळतो. फुल एलईडी हॉकआय हेडलॅम्प व नवीन एलईडी टेल लॅम्प्स नवीन लुक व लक्षवेधक डिझाइन देत प्रबळ प्रभाव निर्माण करतात.
आरामदायी व प्रिमिअम इंटीरिअर: नवीन झेडएस ईव्हीमध्ये ग्राहकांच्या आरामदायीपणाला प्राधान्य देण्यात आले आहे. यामधील प्रगत वैशिष्ट्ये व स्टायलिंग ग्राहकांना लक्झरी व सुधारित आकर्षकतेसह लक्झरीअस, आरामदायी व सोईस्कर इन-केबिन अनुभव देतात. प्रिमिअम लेदर-स्तरीय डॅशबोर्ड, सेंटर आर्मरेस्ट व ड्युअल-पेन पॅनोरॅमिक स्काय रूफ त्वरित नूतनीकरण व आधुनिक रूप देण्यात आलेल्या इंटीरिअरचे लक्ष वेधून घेऊ शकतात. नवीन झेडएस ईव्ही मागील आसनावरील प्रवाशांना अधिक आरामदायीपणा देखील देते. ते आता नवीनच भर करण्यात आलेले रिअर सेंटर हेडरेस्ट, रिअर सेंटर आर्मरेस्टसह कपहोल्डर्स आणि रिअर एसी वेण्ट्ससह प्रत्येक ट्रिपदरम्यान असाधारण आरामदायी प्रवासाचा आनंद घेऊ शकतात.
नवीन व सुधारित तंत्रज्ञान: विद्यमान झेडएस ईव्हीमध्ये अनेक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत, तर नवीन झेडएस ईव्ही या वैशिष्ट्यांना अधिक पुढे घेऊन जाते. या नवीन वेईकलमध्ये फुल डिजिटल क्लस्टरसह १७.७८ सेमी (७ इंच) एम्बेडेड एलसीडी स्क्रीन, १०.१ इंच एचडी टचस्क्रीनसह अँड्रॉईड ऑटो व अॅप्पल कारप्ले, वायरलेस फोन चार्जिंग, ५ यूएसबी पोर्टससह २ टाइप सी चार्जिंग पोर्टस्, ऑटो एसीच्या माध्यमातून क्लायमेट कंट्रोल व पीएम २.५ फिल्टर अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत. तसेच या वेईकलमध्ये प्रगत आय-स्मार्ट कनेक्टीव्हीटी सिस्टिमसह ७५ हून अधिक वैशिष्ट्ये आहेत, जी राइडला स्मार्ट बनवतात. नवीन झेडएस ईव्हीमध्ये डिजिटल ब्ल्यूटूथ की देखील आहे, जी ग्राहकांना निवडक केसेसमध्ये की शिवाय ड्राइव्ह करण्याची सुविधा देते.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरक्षिततेला प्राधान्य: नवीन झेडएस ईव्ही ६ एअरबॅग्स, ३६०-डिग्री कॅमेरा व हिल डिसेण्ट कंट्रोलसह टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम (टीपीएमएस) आणि सुलभ व नियंत्रित ड्राइव्हसाठी इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ईएससी) या वैशिष्ट्यांसह अधिक सुरक्षिततेची खात्री देते. नवीन झेडएस ईव्हीमध्ये रिअर ड्राइव्ह असिस्ट वैशिष्ट्ये आहेत, जी ड्रायव्हर व प्रवाशांची सुरक्षितता वाढवतात. यामध्ये ब्लाइण्ड स्पॉट डिटेक्शन (बीएसडी) आहे, जे बाहेरील रिअर व्ह्यू मिररमधून न दिसणा-या व नकळतपणे येणा-या वाहनांना ओळखण्यामध्ये मदत करते. यामध्ये लेन चेंज असिस्ट (एलसीए) देखील आहे, जे ड्रायव्हरला इंडीकेटर सुरू करताच होणा-या संभाव्य अपघाताबाबत चेतावणी देते. तसेच यामध्ये रिअर क्रॉस ट्राफिक अलर्ट (आरसीटीए) आहे, जे मागील बाजूस डाव्या किंवा उजव्या बाजूने येणा-या, पण रिव्हर्स कॅमेरा व रिअर पार्किंग सेन्सर्समध्ये न दिसणा-या कार्सना ओळखते.
अधिक मोठी, शक्तिशाली व अधिक सुरक्षित बॅटरी: नवीन झेडएस ईव्हीमध्ये आता विभागातील सर्वात मोठी ५०.३ केडब्ल्यूएच प्रगत तंत्रज्ञान बॅटरी असेल, जी सर्वोत्तम जागतिक सुरक्षा मानकांची (आयपी६९के व एएसआयएल-डी) पूर्तता करते. यामध्ये नवीन शक्तिशाली मोटर आहे, जी १७६ पीएसची दर्जात्मक शक्ती देते आणि वेईकल फक्त ८.५ सेकंदांमध्ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्त करते. तसेच बॅटरीच्या आठ स्पेशल सेफ्टी तपासण्या करण्यात आल्या आहेत आणि यूएल२५८० जागतिक प्रमाणन मिळाले आहे.
पायाभूत सुविधा: एमजी मोटर भारतातील ईव्ही पायाभूत सुविधा प्रबळ करण्याप्रती सावध पावले उचलत आहे. ब्रॅण्डने नुकतेच ‘एमजी चार्ज’ लाँच केले आहे, जेथे भारतभरातील निवासी ठिकाणी १००० एसी फास्ट चार्जर्स इन्स्टॉल करण्यात येतील. यापूर्वी एमजीने देशभरात डीसी व एसी फास्ट चार्जर्स सादर करण्यासाठी फोर्टम, डेल्टा, ईचार्जबेज, एक्झिकॉम, इलेक्ट्रिफाय व टाटा पॉवर या कंपन्यांसोबत सहयोग देखील केला आहे.
नवीन झेडएस ईव्हीमध्ये खाजगी ग्राहकांसाठी एमजी ईशील्ड आहे, जेथे ऑटोमेकर अमर्यादित किलोमीटर्ससाठी मोफत ५ वर्षांची वॉरंटी, बॅटरी पॅक सिस्टिमवर ८ वर्षे / १.५ लाख किमी वॉरंटी, ५ वर्षांसाठी अहोरात्र रोडसाइड असिस्टण्स (आरएसए) आणि ५ लेबर-फ्री सर्विसेस देते.