गुरूवार, नोव्हेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

एमजी मोटरची नवी इलेक्ट्रिक कार लवकरच होणार लाँच; ही असेल किंमत

डिसेंबर 9, 2021 | 7:45 pm
in संमिश्र वार्ता
0
MG Motor

मुंबई- एमजी मोटर इंडिया देशातील इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रामधील आपली भूमिका अधिक सुधारित करण्‍यासाठी आगामी आर्थिक वर्षाच्या शेवटी १० ते १५ लाख रूपये किंमत असलेली इलेक्ट्रिक कार (वेईकल) लाँच करणार आहे. सध्या इलेक्ट्रिक एसयूव्ही झेडएस ईव्हीची विक्री करणारी कंपनी जागतिक व्यासपीठावर आधारित इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर वेईकल लाँच करेल.
एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले, एसयूव्ही अॅस्टरनंतर आमच्या पुढील उत्पादनासंदर्भात आम्ही ईव्हीबाबत विचार करत आलो आहोत आणि आता आम्हाला सरकारकडून स्पष्ट अभिप्रायासह प्रेरणा मिळाली आहे की, ईव्ही भविष्य असणार आहे.आम्ही निर्णय घेतला आहे की, आम्ही पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत ईव्ही सादर करणार आहोत. या वेईकलची किंमत १० लाख ते १५ लाख रूपयांपर्यंत असेल आणि वैयक्तिक इलेक्ट्रिक मोबिलिटी विभागावर लक्ष्य करेल.
छाबा पुढे म्हणाले, “ही एक आगळीवेगळी क्रॉसओव्हर आहे आणि ही वेईकल जागतिक व्यासपीठावर आधारित असणार आहे, जे आम्ही विकसित करणार आहोत. तसेच ही भारतासह सर्व उदयोन्मुख बाजारपेठांमधील मास मार्केटसाठी ईव्ही असणार आहे. आम्ही श्रेणी, भारतीय नियमन व ग्राहकांच्या आवडीनुसार या कारला सानुकूल करू. ही वेईकल विशेषत: भारतीयांसाठी डिझाइन करण्यात येईल. आम्ही लवकरच या वेईकलवर काम करण्यास सुरूवात करणार आहोत. आम्ही १० लाख रूपये ते १५ लाख रूपयांदरम्यान किंमत असलेली कार डिझाइन करू शकलो तर त्यामधून आम्हाला उत्तम उत्पन्न मिळू शकेल. म्हणून आशा करतो की, ही आम्हाला उत्तम उत्पन्न मिळवून देणारी ईव्ही कार असेल.
छाबा पुढे म्हणाले की, “ऑटो विभागासाठी सरकारने प्रॉडक्शन लिंक (पीएलआय) संदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शकतत्त्वांची पूर्तता करण्यासाठी एमजी मोटर इंडिया तिच्या आगामी ईव्हीमध्ये अनेक स्थानिक पार्टसचा वापर करेल. यामध्ये बॅटरी असेम्ब्ली, मोटर्स आणि इतर पार्टसचे स्थानिकीकरणाचा समावेश असेल. एमजी मोटर इंडियाची इलेक्ट्रिक मोबिलिटीमधील इतर ऑफरिंग झेडएस ईव्ही दोन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध आहे आणि त्यांची किंमत २१ लाख रूपये व २४.६८ लाख रूपये (एक्स-शोरूम) आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खुषखबर! जानेवारीपासून नाशिक-गोवा विमानसेवा; अवघ्या दोन तासांचा प्रवास

Next Post

महाराष्ट्र शासनाच्यावतीने ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात येईल; छगन भुजबळ

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
annasaheb
इतर

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज बंद?

नोव्हेंबर 12, 2025
Untitled 39
मुख्य बातमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशकात… कुंभमेळ्याच्या या विकासकामांचे होणार भूमीपूजन…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
chhagan bhujbal e1653742993678

महाराष्ट्र शासनाच्यावतीने ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात येईल; छगन भुजबळ

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011