इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रेमाला जात, धर्म अशा कशाचेच बंधन नसते. प्रेमात आकंठ बुडालेल्यांना वास्तवाचे भान नसते. यातूनच अनेकदा हे प्रेमी युगुल टोकाचे पाऊल उचलताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतो आहे. या दाम्पत्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला, याचा तपास पोलीस करत आहेत.
सीसीटीव्ही
कोलकाता येथील प्रेमी युगलाच्या आत्महत्येचा सीसीटिव्ही फूटेज सध्या सोशल मीडयावर तुफान व्हायरल होतो आहे. तुम्हाला जर असे काही पाहून त्रास होणार असेल तर तुम्ही कृपया हा व्हिडीओ पाहू नका. या प्रेमी जोडप्याने आत्महत्या करण्यासाठी मेट्रो ट्रॅकवर उडी मारली. कोलकाता मेट्रोच्या नोआपारा स्टेशनवरील हा व्हिडीओ असल्याचे समजते. समोरून मेट्रो येताना पाहून एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीला मिठी मारत तिच्यासोबतच ट्रॅकवर उडी मारली. ही उडी मारण्यापूर्वी हे जोडपे स्टेशनवर एकत्र फिरत असल्याचे दिसून येते. त्याचवेळी ट्रॅकवरुन मेट्रोही वेगाने पुढे येत आहे. मेट्रो दिसताच या व्यक्तीने आपल्या प्रेयसीसह मेट्रोखाली उडी मारली.
देव तारी त्याला…
हा अपघात पाहून असे वाटते की, या अपघातात पुरुष आणि महिला दोघांचाही मृत्यू झाला आहे. मात्र, तसे झाले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रो कर्मचाऱ्यांनी या जोडप्याची सुटका केली आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली. या अपघातामुळे कोलकाता मेट्रोच्या उत्तर-दक्षिण मार्गावरील सेवा विस्कळीत झाली. आत्महत्येच्या प्रयत्नानंतर तासाभरात सेवा पुन्हा सुरू झाल्या.
Metro Video Viral Boy Friend Jump Girl