नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृतसेवा) – विकृत मनोवृतीचा एक माणूस मेट्रोमध्ये फिरताना आपल्या वाईट कृत्याला आवर घालू शकत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये मेट्रोमध्ये गर्दीचा फायदा घेत एका मुलीचा विनयभंग करण्यात आला. त्यानंतर मेट्रो पोलिसांनी आरोपीला अटक केली.
या घटनेतील आरोपी संजीव कुमार (३९) हा कृष्णा नगर येथील रहिवासी आहे. तरुणीच्या लेखी तक्रारीवरून यमुना डेपो मेट्रो पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी सांगितले की, तरुणीने यमुना डेपो येथील मेट्रो पोलिस स्टेशन गाठले आणि लेखी तक्रार दाखल केली.
तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती कडकडडूमा येथून ब्लू लाइन मेट्रोमध्ये चढली होती. तेव्हा तिथे खूप गर्दी होती. त्यानंतर कोचमध्ये तिच्या शेजारी उभा असलेला तरुण तिच्या अगदी जवळ आला. तो तरुण तिचा विनयभंग करत होता. अयोग्यरित्या अंगाला स्पर्श करू लागला.
सदर मुलीने आक्षेप घेतल्यानंतर तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्याने विनयभंग सुरूच ठेवला. मुलगी अस्वस्थ झाली आणि तिने ट्रेन थांबवण्याचा विचार केला, परंतु मेट्रोच्या डब्यातील आपत्कालीन बटण तिच्यापासून खुप दूरवर होते.
अशा स्थितीत अस्वस्थ होऊन ती यमुना बँक मेट्रो स्टेशनवर उतरली. मात्र येथेही विनयभंग करणारा तरुण तिच्यासोबत खाली उतरला आणि तिच्या मागे आला. त्याने तरुणीशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने त्याला टाळण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान या तरुणीने पोलिसांना फोन केला, मात्र पोलिस येण्यापूर्वीच आरोपी पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.