मेक्सिको – मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटीमध्ये मेट्रोचा पूल कोसळल्याने २४ जणांचा मृत्यू आणि ७९ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी सायंकाळी मेट्रो मार्गावरुन जात असताना पूल अचानक कोसळल्याने ही घटना घडली. ही संपूर्ण घटना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात नोंदली गेली असून त्याचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मेक्सिकोच्या नगराध्यक्षा क्लॉडिया शिनबॉम यांनी सांगितले की, या घटनेत २४ जणांचा मृत्यू झाला असून या अपघातात सुमारे ७९ जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सध्या सुरू आहे. आणखी काही लोक मलब्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे, या अपघातात एक कारही सापडली आहे. सोशल मीडियावर प्रसारित होणार्या व्हिडिओमध्ये मेट्रो रेल्वेचे डबे हवेत लटकलेले दिसत असून पूलाखाली उभे असलेल्या मोटारींनाही यामुळे धडक बसली होती.
दरम्यान, परराष्ट्रमंत्री मार्सेलो एबरार्ड हे मेक्सिको सिटीचे महापौर असताना ही मेट्रो लाइन तयार करण्यात आली होती. एबार्ड यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, मेट्रोचा अपघात एक अतिशय दुःखद घटना आहे. या अपघातानंतर मेट्रोच्या एलिव्हेटेड ट्रॅकच्या बांधणी व मजबुतीकरणावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जखमींना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच मेक्सिकोमध्ये अशा वेळी हा अपघात झाला जेव्हा संपूर्ण देश कोरोना संकटाचा सामना करीत आहे.
बघा थरारक व्हिडिओ
https://twitter.com/heraldodemexico/status/1389432730614632452