गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मोठी कारवाई…५२.६७ कोटीचे मेथाम्फेटामाइन टॅब्लेट्स जप्त…

by Gautam Sancheti
एप्रिल 14, 2025 | 10:13 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
image003XAIV

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महसूल गुप्तचर संचालनालयाने केलेल्या एका महत्त्वपूर्ण कारवाईत, मिझोरामच्या सीमेजवळ ऐजवाल परिसरात १२ चाकी ट्रक अडवून ५२.६७ किलो मेथाम्फेटामाइन गोळ्या जप्त केल्या, ज्याचे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ बाजारातील मूल्य ५२.६७ कोटी रुपये आहे.

या कारवाईत तस्करी करण्यात येत असलेले अंमली पदार्थ लपविण्याची आणि वाहतूक करण्याची एक अभिनव पद्धत उघडकीस आली – ट्रकच्या ताडपत्रीच्या आच्छादनाखालील फटीत काळजीपूर्वक वेष्टण केलेली विटांच्या आकाराची ५३ पुडकी लपवून ठेवण्यात आली होती.

या पुडक्यावर ३०३० केवळ निर्यातीसाठी आणि ९९९ असे कोरले होते, तसेच हिऱ्यासारख्या चिन्हांसह त्यात केशरी-गुलाबी रंगाच्या गोळ्या होत्या. एनडीपीएस क्षेत्रीय चाचणी साहित्य वापरून केलेल्या चाचण्यांमध्ये गोळ्यांच्या स्वरूपातील मेथाम्फेटामाइन असल्याचे सिद्ध झाले.

नागालँडमधील नोंदणी असलेला हा ट्रक भारत-म्यानमार सीमेजवळील संवेदनशील सीमावर्ती शहर झोखावथार येथून निघून त्रिपुराकडे जात होता. मिझोराममधून ट्रक बाहेर पडण्यापूर्वी डीआरआयने या वाहनाला अडवले. विशेष बाब म्हणजे, त्या वेळी ट्रकमध्ये कोणतीही जाहीर सामग्री नव्हती. याआधी, तो मेघालयातून चंफाई येथे सिमेंटची वाहतूक करत होता आणि नंतर झोखावथार येथे रवाना झाला होता, जिथे हा निषिद्ध असलेला माल भरण्यात आला होता.

ट्रकच्या चालकाला आणि त्याच्या सहाय्यकाला नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायदा, १९८५ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की हे अंमली पदार्थ म्यानमारहून झोखावथार क्षेत्रामार्गे मिझोराममध्ये तस्करी करण्यात आले होते.

महसूल गुप्तचर संचालनालयाने जानेवारी २०२५ पासून आजपर्यंत ईशान्येकडील प्रदेशात १४८.५० किलो मेथाम्फेटामाइन गोळ्या जप्त केल्या आहेत, ज्याद्वारे त्यांची अंमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठीची अतूट वचनबद्धता प्रतीत होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मराठी म्हणून एकत्र नाही आलो तर…राज ठाकरे यांची आंबेडकर जयंती निमित्त पोस्ट चर्चेत

Next Post

गुजरातच्या समुद्रात १८०० कोटींचा ड्रग्जसाठा असणारी बोट पकडली…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 10

गुजरातच्या समुद्रात १८०० कोटींचा ड्रग्जसाठा असणारी बोट पकडली…

ताज्या बातम्या

jail11

ठाणे येथे ४७ कोटी ३२ लाखाच्या बनावट आयटीसी फसवणूक प्रकरणात मुख्य सूत्रधाराला अटक

ऑगस्ट 21, 2025
Untitled 35

बेस्ट निवडणुकीच्या पराभवानंतर राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला..नेमकी काय चर्चा झाली?

ऑगस्ट 21, 2025
amit shah 1

भ्रष्टाचारी व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी विरोधी पक्षांच्या आघाडीचे असभ्य वर्तन….लोकसभेतील गोंधळावर अमित शाह कडाडले

ऑगस्ट 21, 2025
crime 13

जळगावमध्ये शेतजमिनीत विजेच्या धक्क्याने मृत्यू पावलेले पाचही जण मध्यप्रदेशातील

ऑगस्ट 21, 2025
Chandrashekhar Bawankule

सणासुदीच्या काळात जनतेची घरे पाडू नका….महसूलमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

ऑगस्ट 21, 2025
WhatsApp Image 2025 08 20 at 8.02.28 PM 1 1

पुण्यात या ठिकाणी २७७ कोटीचे दुमजली उड्डाणपुल…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

ऑगस्ट 21, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011