मुंबई – राज्याच्या हवामान विभागावर होत असलेला विपरीत परिणाम कायम आहे. त्यामुळेच तपमानातील चढउताराबरोबरच आता आगामी दोन दिवस पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पश्चिमी चक्रीवातामुळे पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, महाराष्ट्र या राज्यांवर त्याचा परिणाम होणार आहे. परिणामी, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात मंगळवारी (२८ डिसेंबर) आणि बुधवारी (२९ डिसेंबर) पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मंगळवारी विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर,मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि विदर्भातील चंद्रपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. तर, बुधवारसाठी हवामान विभागाने गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट दिला आहे. तसेच, ३० डिसेंबरपासून राज्याच्या किमान तपमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने घसरण होईल. म्हणजेच, ३० डिसेंबरपासून पुन्हा थंडीची लाट राज्यात सक्रीय होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
हवामान विभागाने दिलेली माहिती अशी