सोमवार, जून 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पाऊस परतला, आता थंडीबाबत हवामान विभागाने दिला हा इशारा

by India Darpan
ऑक्टोबर 28, 2022 | 10:19 am
in संमिश्र वार्ता
0
havaman vibhag

 

इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – जाणार जाणार म्हणत अखेर मान्सून परतला. नैऋत्य मोसमी वारे माघारी फिरताच राज्यातील हवामानात झपाट्याने बदल होत आहे. रात्रीच्या किमान तापमानात घट झाली असून, हा गारवा आल्हाददायक आहे. राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात गारवा वाढत आहे. विदर्भातही रात्री हलका गारवा जाणवत आहे.

राज्यात पुढील आठवडाभर हवामान कोरडे असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे रात्रीचे किमान तापमान सरासरीखालीच राहणार असून दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.
आपल्या नेहमीच्या वेळापत्रकापेक्षा जवळपास महिनाभर जास्त आपला मुक्काम लांबवून मान्सून नुकताच परतला आहे. संपूर्ण राज्यातच सध्या कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. दिवाळीच्या कालावधीत पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आठवड्यापूर्वीच व्यक्त करण्यात आली होती. हा अंदाज बरोबर ठरला असून मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागांत, तर कोकणात काही ठिकाणी रात्रीच्या किमान तापमानात घट झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही काही भागांत किमान तापमानात घट होत आहे.

दोनच दिवसांपूर्वी राज्यात सर्वच भागांत रात्रीचे किमान तापमान २० अंशांच्या पुढे होते. मध्य महाराष्ट्रात २१ ते २२ अंश, मराठवाडा आणि विदर्भात २१ ते २३ अंश, तर मुंबई परिसरासह कोकण विभागात रात्रीचे किमान तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. हे तापमान सरासरीच्या तुलनेत १ ते ४ अंशांनी अधिक होते. त्यात दोनच दिवसांत मोठा बदल झाला आहे. रात्रीचे किमान तापमान कमी होत असून, दिवसाचे कमाल तापमान वाढत आहे. सध्या सर्वत्र रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या खाली आले आहे. मध्य महाराष्ट्रात किमान तापमान १२ ते १४ अंशांपर्यंत खाली आले आहे. कोकणात १९ ते २२, मराठवाडय़ात १४ ते १७, तर विदर्भात १७ ते १८ अंशांपर्यंत रात्रीचे तापमान खाली आले आहे. राज्यातील निचांकी तापमान महाबळेश्वर येथे १२.२ अंश सेल्सिअस नोंदिवले गेले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेवर प्रेक्षक नाराज; भावनांशी खेळ होत असल्याचा आरोप

Next Post

वाढदिवसानिमित्त सिध्दार्थ जाधवला मिळाली ही अनोखी भेट

Next Post
sidhart jadhav

वाढदिवसानिमित्त सिध्दार्थ जाधवला मिळाली ही अनोखी भेट

ताज्या बातम्या

Maha Gov logo 07 1 1024x512 1

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत या तारखेपर्यंत वाढवली…

जून 2, 2025
Untitled 5

NEET परीक्षा पुढे ढकलली…न्यायालयाच्या निर्देशानंतर निर्णय

जून 2, 2025
वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत बैठक 1 1 1024x683 1

वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक….नियोजनाची सुरु झाली तयारी

जून 2, 2025
crime 1111

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळयातील दीड लाखाची सोनसाखळी केली लंपास

जून 2, 2025
crime1

साड्या घेण्यासाठी आलेल्या ग्राहक महिलेने दुकानदार महिलेचे अंगावरील दागिणे असे केले लंपास…

जून 2, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

सिक्कीम येथे भुस्खलनामुळे राज्यातील अडकलेले ४० पर्यटक सुखरूप…

जून 2, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011