औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी उत्तर महाराष्ट्रासह विदर्भाच्या अनेक भागात उल्कावर्षाव पहायला मिळाला. उल्कापाताचे हे दृष्य आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी अनेक जण पुढे सरसावले. तसेच, या संबंधीचे व्हिडिओ सोशल मिडियात वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले आहेत. काही जणांच्या मते लोखंडी रिंग आकाशातून पडली तर कुठे उल्का कोसळल्याचे सांगितले जात आहे.
न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरुन भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६:११ वाजता तेथील रॅाकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन रॅाकेटव्दारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या ४३० किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला. आजच्या तारखेत केवळ एकाच रॅाकेट उड्डाणाची नोंद असल्याने आज सायंकाळी उत्तर – पुर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या इलेक्ट्रॉन रॅाकेटच्या बुस्टरचेच असावेत अशी माहिती औरंगाबाद येथील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली. ते म्हणाले की, आपल्या भागात साधारण तीस ते पस्तीस किमी उंचीवरून बुस्टर वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले. दिसणार्या घटनेचा मार्ग व प्रकाशमान याचा अंदाज घेतला तर ही कोणतीही उल्का वर्षाव किंवा उडती तबकडी सारखी घटना नाही हे निश्चीत.
https://twitter.com/ANI/status/1510297682996195329?s=20&t=WzRUlNDBHwhJS1dpWwhKXA
अकोला, बुलठाणा जिल्हयातील काही भागात उल्का पात झाल्याचे बोलले जात होते. सायंकाळी ७.४५ मिनिटांनी जळगाव जामोद तसेच बुलडाणा तालुक्याच्या परिसरात पश्चिमेकडून पूर्वेकडे आभाळातून विमान किंवा रॅकेट सारखे वरून जाताना दिसले, मागे आग लागलेली होती तसेच विमानाच्या मागे ४० ते ५० फूट आग आणि धुवा दिसत होता. याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात होते. त्यामुळे औंधकर यांनी ही माहिती दिली.