इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकची मूळ कंपनी मेटाने दुसऱ्यांदा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीची तयारी केली आहे. यावेळी कंपनी १० हजार कामगारांना कामावरून कमी करण्याचा विचार करत आहे. खुद्द कंपनीनेच याची घोषणा केली आहे. मेटाने जाहीर केले की ते त्यांच्या कंपनीतून अंदाजे १० हजार कर्मचारी कमी करू शकतात. आणि अंदाजे ५ हजार अतिरिक्त खुल्या पोझिशन्स बंद करण्याची अपेक्षा करते. कंपनीने चार महिन्यांपूर्वीच सुमारे ११ हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे.
मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी कंपनीतील मोठ्या कर्मचारी कपातीचे संकेत दिले आहेत. “आम्ही आमच्या टीममधील अंदाजे १० हजार कर्मचारी कमी करण्याची आणि अंदाजे ५ हजार अतिरिक्त ओपन पोझिशन्स बंद करण्याची अपेक्षा करतो,” असे झुकरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे. खरंच, मेटा भविष्यकालीन मेटाव्हर्स विकसित करण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत असल्याने, कंपनीला उच्च चलनवाढ आणि वाढत्या व्याजदरांचा सामना करावा लागतो आहे. तसेच, कंपनी महामारीनंतरच्या मंदीशीही झुंज देत आहे.
याआधीही फेसबुकची मूळ कंपनी मेटाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुमारे ११ हजार लोकांना कामावरून काढून टाकले होते. कंपनीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्मचारी कपात केली होती. सप्टेंबरच्या शेवटी कंपनीने सांगितले होते की मेटामध्ये एकूण ८७ हजार कर्मचारी काम करतात.
लाखो नोकऱ्या गेल्या
बिघडत चाललेल्या अर्थव्यवस्थेमुळे कॉर्पोरेट अमेरिकेत मोठ्या प्रमाणात नोकऱ्या कमी होऊ लागल्या आहेत. यामध्ये गोल्डमन सॅक्स आणि मॉर्गन स्टॅन्ले सारख्या वॉल स्ट्रीट बँकांपासून ते Amazon आणि Microsoft सारख्या मोठ्या टेक फर्मपर्यंत सर्वच क्षेत्रात त्याचा प्रभाव आहे. लेऑफ ट्रॅकिंग साइटनुसार, 2022 च्या सुरुवातीपासून टेक वर्ल्डने २ लाख ८० हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. त्यापैकी यंदा सुमारे ४० टक्के कामे झाली आहेत.
Meta Layoffs 10 Thousand Employees from Company