पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचा रमजान ईदच्या पूर्वसंध्येला दिला हा संदेश
……….
खरेतर पवित्र रमजान पर्व येणाऱ्या तासांत समारोपाकडे जात असताना सोबतीला कोरोनाच्या भीषण लाटेचा सामना आपण करत आहोत. यंदाची लाट ही पहिल्या पेक्षा अधिक तीव्र आहे. परंतु प्रत्येकाच्या उंबऱ्यावर तिसरी लाट येऊन कोणते रूप धारण करेल हे सांगता येणं कठीण आहे. काही देशांमध्ये चौथी लाट आल्याचे चर्चिले जात आहे. त्यात म्युकर मायकॉसिस सारखे गंभीर आजार डोके वर काढत आहे.
मी या पवित्र सणाला दुःखाचे आर्जव जोडू इच्छित नाही परंतु अनेक घरांचे करते जग सोडून गेले याची खंत प्रत्येकालाच आहे. पोलीस प्रशासन म्हणून आम्ही नियम आखून दिलेले आहे परंतु त्याची अंमलबजावणी आपल्याला काही दिवस करावी लागणार आहे. आपल्या आरोग्य संपन्नतेसाठी भर उन्हात बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस बांधवांना आपण मनापासून सहकार्य करावे तेव्हाच सर्वतोपरी नियम पाळून ही लढाई आपण जिंकू अशी मला अपेक्षा आहे. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मी आपल्याला आवाहन करतो कि ईद-उल-फित्रची नमाज घरीच अदा करा.मस्जिद मध्ये मौलाना यांच्या व्यतिरिक्त कुणीही जाऊ नये. सार्वजनिक गर्दी टाळा. जिल्ह्यातील सर्वच मस्जिद कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती असेल की आपण देखील स्थानिक पातळीवर नियम पाळण्याचे आवाहन करावे जेणेकरून होणारा संसर्ग व त्यातून पुन्हा वाढणारी बधितांची आकडेवारी आपण आटोक्यात ठेऊ शकतो आणि आपण ती ठेऊच असा निर्धार सर्वजण करूया.
पुनःश्च एकदा सर्वांना रमजान ईदच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा देतो.
मास्क वापरा-नियम पाळा-कोरोना टाळा.
जय हिंद.!