विशेष प्रतिनिधी, मुंबई
आजच्या काळात कुणाला काही समस्या किंवा प्रश्न निर्माण झाला की लगेच गुगलची मदत घेतली जाते, गुगलवर शोध सुरू होतो. परंतु पुरुष मंडळी गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात. हे जाणून घेणे मनोरंजक ठरेल. गुगलवर पुरुष कोणत्या गोष्टी सर्वात जास्त काय शोधतात याचा अंदाज लावाला लागतो. आरोग्य असो की सौंदर्य, बहुतेक लोक गूगलच्या सल्ल्यावर डोळेझाक करतात. मात्र कोरोनामुळे अनेक लोकांचा बराच वेळ इंटरनेटवर काही तरी बघण्यात जात आहे. त्यांची प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी गुगलची मदत घेत आहेत.
अलीकडेच frommars.com द्वारा एक संशोधन केले गेले आहे, त्यामध्ये असे आढळले आहे की, पुरुष गुगल वर सर्वाधिक काय शोधतात. खरे तर पुरुषांच्या लैंगिक जीवनापासून ते केस गळण्यापर्यंत सोशल मीडियावर बर्याच गोष्टी चुकीच्या माहितीवर आधारित आहेत. त्यांचे अनुकरण करण्याच्या प्रयत्नात त्यांना नुकसान सहन करावे लागू शकते. कोणत्या पाच गोष्टींचा गुगलवर सर्वाधिक शोध घेतला हे जाणून घेऊ या…
१) दरवर्षी ६८ हजार ६०० लोकांनी गुगलवर शोध घेतला की, कमकुवत लैंगिक संबंध असणे हे नपुंसकत्व आहे की नाही?
२) दरवर्षी सरासरी ६८ हजार ४०० लोकांनी गुगलवर सर्च केले की, रोज शेविंग केल्याने दाढीचे केस अधिक वाढतात का?
३) पुरुषांना स्तनाचा कर्करोग होऊ शकतो की नाही? हे दरवर्षी ६८ हजार २०० लोकांनी गुगलवर शोधले.
४) टोपी परिधान केल्यामुळे आणि केस वाढविण्यामुळे पुरुषांना टक्कल पडते का? याचा दरवर्षी सरासरी ५२ हजार १०० लोकांनी शोध घेतात.
५) वर्कआउटनंतर प्रथिने ताबडतोब घ्यावीत की नाही? तसेच कोणती प्रथिने घ्यावीत याचा ५१ हजार लोकांनी शोध घेतला.
आता गुगल मध्ये या प्रश्नांची योग्य उत्तरे कोणती आहेत, ते जाणून घेऊ
एखाद्या माणसाला लैंगिक संबंधामध्ये कमकुवतपणा वाटत असेल तर ते नपुंसकत्वपणामुळे नाही. तसेच वृद्धांमध्ये या प्रकारची समस्या खूप सामान्य आहे. या व्यतिरिक्त मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब यासारख्या आरोग्याच्या समस्यांमुळे बर्याच वेळा देखील हे कारणीभूत ठरते. अशा परिस्थितीत लोक त्यांच्या जीवनशैलीत काही बदल करून या समस्येवर मात करू शकतात.
गुगल तज्ज्ञांच्या मते, वारंवार शेविंग केल्याने केस वाढतात याचा पुरावा नाही. आपण आपल्या केसांमध्ये किंवा चेहर्यामध्ये काही बदल करीत असल्यास, याची अनेक कारणे असू शकतात. कधीकधी काही औषधे जास्त प्रमाणात घेतल्यामुळे उद्भवू शकते. तज्ज्ञांच्या मते, पुरुषमध्ये स्त्रियांइतके हे आजार होत नसतात, परंतु त्यांना स्तनाचा कर्करोग देखील होऊ शकतो. वयाच्या ६०व्या नंतर पुरुषांना या समस्येचा त्रास होऊ शकतो.