शांघाय (चीन) – आजच्या आधुनिक काळात स्त्री आणि पुरुष या दोघांना समान मानले जाते. तरीही स्त्री जवळ एक वेगळीच देणगी असते. ती म्हणजे बाळाला जन्म देणे. परंतु आता पुरुष देखील बाळाला जन्म देऊ शकतो, असे असा दावा चीन मधील शास्त्रज्ञांनी केला आहे. या संशोधनामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.
कोरोनाच्या संकटासाठी जगभरातील अनेकजण देश चीनला दोषी ठरवत आहेत. परंतु चिनी शास्त्रज्ञांची ख्याती ही विचित्र संशोधनासाठीच जास्त आहे. आता चिनी शास्त्रज्ञांच्या एका गटाने स्त्री प्रमाणेच पुरुष देखील बाळाला जन्म देऊ शकेल, असा दावा केला आहे. औषधे आणि शस्त्रक्रिया यांच्या मदतीने पुरुषाच्या शरीरात बदल करणे शक्य आहे. या बदलांनंतर पुरुष बाळाला जन्म देऊ शकेल, असे चिनी शास्त्रज्ञांच्या एका गटाचे म्हटले आहे.
चिनी शास्त्रज्ञांनी निवडक नर उंदरांवर काही प्रयोग केले. मादी उंदराच्या शरीरातून काढलेले गर्भाशय नर उंदराच्या शरीरात बसवले. यासाठी नर उंदराच्या शरीरात आधी काही बदल केले. त्यानंतर गर्भाशय आणि त्याच्याशी संलग्न अवयव यांच्या कारभारात अडचण येत नाही ना, याची तपासणी केली. सर्व सुरळीत झाल्यानंतर काही काळाने नर उंदीर गरोदर राहिला. सिझेरियन पद्धतीने उंदराच्या पिलांचा जन्म झाला. संपूर्ण संशोधनाला चिनी शासत्रज्ञांनी ‘ रॅट मॉडेल ‘ असे नाव दिले आहे. या संशोधनामुळे पुरुषाला महिलेप्रमाणे गरोदर राहण्याचा पर्याय खुला करुन देण्याच्या दिशेने सुरू असलेल्या संशोधनाला चालना मिळेल, असे चिनी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
ट्रान्सजेंडर्स अर्थात तृतीयपंथीयांना या संशोधनामुळे भविष्यात स्वतःच्या बाळाला जन्म देण्यासाठी मदत करणे शक्य होईल, असेही चिनी शासत्रज्ञांनी सांगितले. नर उंदराला गरोदर करण्यासंबंधीचा हा प्रयोग चीनमधील शांघायच्या नेव्हल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आला. मादी उंदराच्या शरीरातील गर्भाशय काढून नर उंदराच्या शरीरात बसवून त्यानंतर सिझेरियनद्वारे जन्माची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
या प्रयोगाच्या यशस्वितेचे सध्याचे प्रमाण ३.६८ टक्के आहे. या प्रयोगात गरोदर राहिलेल्या नर उंदराने दहा उंदरांना सिझेरियन पद्धतीने जन्म दिला. चिनी शास्त्रज्ञ रॅट मॉडेल प्रमाणेच ह्युमन मॉडेल विकसित करता येईल, असा दावा करत आहेत. तसेच महिलेप्रमाणे पुरुषाला गरोदर राहण्याचा पर्याय खुला करुन देता येईल, असा विश्वास चिनी शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत.