मुंबई – काही जणांचे नशिब इतके चांगले असते की, अनेकदा कोणतीही मेहनत न करता त्यांच्यावर पैशांचा पाऊस पडतो. अमेरिकेत अशीच एक घटना नुकतीच घडली आहे. अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एका व्यक्तीला बाथरूममध्ये चार कोटी रुपयांचे धन सापडले. बाथरूममध्ये दुरुस्तीचे काम करताना एका प्लंबरला हा धनलाभ झाला होता.
बाथरूममची भिंत फोडली अन्…
प्लंबरने स्वच्छतागृहाची भिंत दुरुस्तीसाठी खोदली तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. २०१४ मध्ये लेकवूड चर्चच्या तिजोरीतून ६ लाख डॉलर चोरी झाले होते. जस्टिन कोल नावाच्या प्लंबरने जेव्हा बाथरूमच्या भिंतीची दुरुस्ती करत होता, तेव्हा भिंतीमध्ये काहीतरी लपवल्याचे त्याला दिसले. भिंत जास्त खोदल्यानंतर त्याला ४ कोटी रुपयांची रोख रक्कम आणि काही धनादेश सापडले.
प्रामाणिकपणाचे उदाहरण
इतक्या मोठ्या प्रमाणात धनलाभ झाल्यानंतरही जस्टिन कोलचा प्रामाणिकपणा थोडाही डगमगला नाही. चार कोटींपैकी एकही रुपया त्याने घेतला नाही. द गार्जियन वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, प्लंबरने प्रामाणिकपणा दाखवला. चर्च प्रशासनाला सगळी हकीगत सांगितली आणि पैसे चर्च प्रशासनाकडे सुपूर्द केले. त्याचा प्रामाणिकपणा पाहून चर्च प्रशासनाने त्याला १५ लाखांचे बक्षीस दिले.
सात वर्षांपूर्वी झाली चोरी
सात वर्षांपूर्वी चर्चच्या तिजोरीतून पैसे चोरी झाले होते. या पैशांचा खूप घेतल्यानंतरही सापडले नाहीत. चोरी झालेल्या पैशांचा शोध घेण्यासाठी चर्चकडून एका खासगी गुप्तहेर संस्थेला लाखो रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कंपनीला जस्टिनच्या कामाबद्दल कळाल्यानंतर त्यांनी तो पैसा जस्टिनला देण्याचा निर्णय घेतला. जस्टिन म्हणाला, की ही बक्षिसाची रक्कम त्याने उधार घेतलेले पैसे चुकविण्यासाठी करणार आहे.