नवी दिल्ली – घानाच्या संसदेत खासदारांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार ताजा असतानाच आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार जॉर्डनमधील आहे. संसदेसारख्या वरिष्ठ सभागृहात खासदारांचे अशोभनीय वर्त यानिमित्ताने पुन्हा चर्चेला आले आहे. जॉर्डनच्या संसदेत खासदार एकमेकांशी भिडले. केवळ हातघाईवर हा प्रकार थांबला नाही तर खासदारांनी लाथा-बुक्क्यांनी एकमेकाचा चांगलेच तुडवले. ही बाब जगभरात चर्चेची बनली आहे. कारण, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर गाजत आहे. बघा हा व्हायरल व्हिडिओ
https://twitter.com/Reuters/status/1475899348437327883?s=20