चाळीसगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील मेहुणबारे पोलिस स्टेशनमधील लाचखोर पोलिस उपनिरीक्षकाला (पीएसआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. गणेश जगन्नाथ ढिकले (वय ३२, रा.जिजाई नगर, तिरपुळे रोड,मेहुणबारे. ता.चाळीसगाव जि.जळगांव) असे लाचखोर पीएसआये नाव आहे. विशेष म्हणजे ढिकले याने तब्बल साडेचार लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र, १ लाख रुपयात तडजोड झाली आणि अखेर तो एसीबीच्या सापळ्यात सापडला आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार
लाचखोर अधिकाऱ्याचे नाव – गणेश जगन्नाथ ढिकले, वय-३२, पोलीस उप निरीक्षक, नेम-मेहुणबारे पोलीस स्टेशन वर्ग-2 लाचेची मागणी- प्रथम 4,50,000/-रू.व तडजोडीअंती 1,00,000/- रु.
लाच स्विकारली- 1,00,000/-रु.
हस्तगत रक्कम- 1,00,000/-रू.
लाचेची मागणी – दि.02/06/2022
लाच स्विकारली- दि.02/06/2022
लाचेचे कारण -. तक्रारदार यांच्या विरुद्ध मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.0071/2022 भादवि कलम-115, 118 व 120 ब प्रमाणे दि.29/03/3022 रोजी गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याच्या कागदपत्रांमध्ये मदत करून चार्जशीट लवकरात लवकर पाठवणे, गुन्ह्यात मदत करणे, सदर गुन्ह्यात पोलीस स्टेशनला दिलेली हजेरी माफ करणे या मोबदल्यात तक्रारदाराकडे लाच मागितली. पंचासमक्ष प्रथम 4,50,000/- रुपये व तडजोडीअंती 1,00,000/-रुपये लाचेची मागणी केली. सदर लाचेची रक्कम ढिकले याने स्वतः वर मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे पंचासमक्ष स्वीकारली म्हणून गुन्हा.
तपास अधिकारी- श्री.शशिकांत श्रीराम पाटील , पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव.
सापळा व मदत पथक- DYSP. श्री.शशिकांत एस.पाटील, PI.संजोग बच्छाव, PI.एन.एन.जाधव स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ.
मार्गदर्शक- 1) मा.श्री.सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
2) मा.श्री.एन.एस.न्याहळदे, साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
3) मा.श्री. सतीश डी.भामरे, साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
आरोपीचे सक्षम अधिकारी- मा.विशेष पोलीस महानिरीक्षक,नाशिक परिक्षेत्र,नाशिक
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477
@ मोबा.क्रं. 8766412529
@ टोल फ्रि क्रं. 1064