नवी दिल्ली – फरार हिरेव्यापारी मेहल चोकसी याला डोमिनिकामधून अटक करण्यात आली आहे. तो अलीकडेच एंटिगुआ आणि बारबुडा येथून बेपत्ता झाला होता. त्याच्याविरोधात इंटरपोलचा येलो नोटीस जारी करण्यात आली होती.
एंटिगुआ आणि बारबुडाच्या सूचनांवर जारी करण्यात आलेल्या येलो नोटीसनंतर डोमिनिकाच्या पोलिसांना चोकसीला मंगळवारी रात्री अटक केली. दोन्ही देशांचे नागरिकत्व घेतल्यानंतर चोकसी २०१८ पासून त्याठिकाणी वास्तव्याला होता. इंटरपोल नोटीस हा फरार असलेल्या लोकांसाठी जारी करण्यात येते. चोकसीला आला एंटिगुआ आणि बारबुडाच्या रॉयल पोलीस फोर्सकडे सोपविण्यात आले आहे. मेहोल चोकसी भारतात १३ हजार ५०० कोटी रुपयांच्या पंजाब नॅशन बँकेतील घोटाळ्याचा आरोपी आहे. भारताने त्याच्याविरुद्ध कारवाई सुरू केल्यामुळे २०१८ मध्ये तो फरार झाला होता. मेहुल चोकसीचे वकील विजय अग्रवाल यांनी एएनआयला सांगितले की, ‘मी मेहूल यांच्या कुटुंबाशी चर्चा केली आहे. ते आनंदी आहेत आणि त्यांना दिलासाही मिळाला आहे. कारण मेहुल बेपत्ता असल्याने त्यांची चिंता वाढलेली होती. मेहूल यांच्याशी संपर्क साधण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.’ मेहुलकडे अनेक कॅरेबियन देशांचे नागरिकत्व आहे. एंटिगुआ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला रविवारी रात्री शेवटचे कारमध्ये बघितले गेले होते. पोलिसांनी तपास अभियानात कार ताब्यात घेतली पण चोकसी सापडला नाही. चोकसीच्या वकिलांनी तो बेपत्ता असल्याची माहिती दिली होती. चोकसीसोबत त्याचा भाचा नीरव मोदीसुद्धा पीएनबी घोटाळ्यात आरोपी आहे. नीरव सध्या लंडनमधील कारागृहात असून भारत सरकार त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करीत आहे.