इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत त्यांनी अशी धमकी कोणत्या अधिकारात देऊ शकतात? असा प्रश्न केला आहे.
त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस साहेब काय सज्जन मंत्री शोधलेत आपण! तुमच्या मंत्रिमंडळाची तर इज्जत जातेच, पण यापेक्षाही महाराष्ट्राची बेअब्रू होतेय, याची जास्त चिंता आहे. कृपया यांना आवरा..!
सभागृहात रम्मी खेळणारे…पैशांच्या बॅगा भरणारे… डान्सबार चालवणारे…आधी वाकडं काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणारे.. यामध्ये भर पडली ती आता थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्याची असेही त्यांनी म्हटले आहे.