मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मनमाड-जळगाव स्थानकादरम्यान तिसऱ्या लोहमार्गाच्या कामासह दुहेरी मार्ग यार्ड रिमॉडेलिंग कामामुळे १४ आणि १५ ऑगस्टला या मार्गावरील ३३ गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. तर १९ गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने हा मेगाब्लॉक घेतल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.
रेल्वे प्रशासनाने रद्द झालेल्या वाहनांची यांदी जाहीर करताना प्रवाशांना होत असलेल्या गैरसोईबद्दल दिलगीरी व्यक्त केली आहे. दरम्यान, दुसरा शनिवार, रविवार, सोमवारची एक दिवसाची सुटी टाकून मंगळवार आणि बुधवारपर्यंत असे सलग ५ दिवस सुटी आली आहे. यामुळे रेल्वेने हे काम हाती घेतले आहे.
रेल्वेने दिली ही माहिती
मध्य रेल्वेने १८३.९४ किमी लांबीच्या भुसावळ-मनमाड विभागादरम्यान नवीन तिसरा मार्ग बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यापैकी भुसावळ ते पाचोरा विभागादरम्यान ७१.७२ किमी नवीन तिसरी री लाईनचे बांधकाम पूर्ण झाले आहे. पाचोरा ते मनमाड विभागादरम्यान उर्वरित ११२.२२ किमी नवीन तिसरी लाईनचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. त्याचाच एक भाग म्हणून भुसावळ विभाग ११ वाजल्यापासून २ दिवस मनमाड स्टेशन यार्डमध्ये इंटरलॉकिंग नसलेल्या कामासाठी विशेष वाहतूक ब्लॉक चालवणार आहे. १४ ते १५ ऑगसप्य पर्यंत १५ तास.
प्रवास जलद होणार
या तिसऱ्या रेल्वे मार्गामुळे मुंबईकडील वाहतूक सुरळीत होईल. गाड्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे अनेकवेळा रेल्वे मार्ग व्यस्त असल्याने रेल्वे गाड्यांचा खोळंबा होतो. सिग्नल न मिळाल्याने अनेक रेल्वे खोळंबून राहतात. परिणामी प्रवासाचे वेळापत्रक बिघडते. प्रामुख्याने जळगाव-भुसावळ दरम्यान ही अडचण येते. तिसऱ्या व चौथ्या रेल्वेमार्गामुळे ही अडचण सुटून जिल्ह्यातील प्रवाशांचा मुंबई व सुरतकडील प्रवास गतिमान होईल.
१४ ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आलेल्या गाड्या
भुसावळ – देवळाली एक्स्प्रेस, नांदेड-मुंबई एक्स्प्रेस, जालना मुंबई एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड एक्स्प्रेस, सिकंदराबाद-मुंबई एक्स्प्रेस, नांदेड-मुंबई एक्स्प्रेस, साईनगर मुंबई वंदे भारत ट्रेन, भुसावळ-इगतपुरी एक्स्प्रेस, जबलपूर-पुणे एक्स्प्रेस, रीवा-पनवेल एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, पुणे-नागपूर एक्स्प्रेस, गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस, आदिलाबाद-मुंबई एक्स्प्रेस, गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस.
१५ ऑगस्ट रोजी रद्द करण्यात गाड्या
मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेन, मुंबई-नांदेड एक्स्प्रेस, इगतपुरी-भुसावळ एक्स्प्रेस, मुंबई-जालना एक्स्प्रेस, पुणे-जबलपूर एक्स्प्रेस, दादर-बलिया एक्स्प्रेस, मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, मुंबई-आदिलाबाद एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड एक्स्प्रेस, मुंबई-सिकंदराबाद एक्स्प्रेस, पनवेल-रीवा एक्स्प्रेस, पुणे-नागपूर एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनल-नांदेड एक्स्प्रेस, नांदेड-मुंबई एक्स्प्रेस, जालना-मुंबई एक्स्प्रेस, आदिलाबाद-मुंबई एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड एक्स्प्रेस.
megablock-on-14th-and-15th-august-on-jalgaon-manmad-railway-line