नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी यंदाची दिवाळी अत्यंत आनंदाची ठरणार आहे. कारण यंदाची दिवाळी रोजगाराभिमुख असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र देशभरात हजारो नोकऱ्यांची घोषणा करणार असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे पुढील वर्षी डिसेंबरअखेर १० लाख नोकऱ्या निर्माण होतील, असे त्यांनी जूनमध्येच सांगितले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान २२ ऑक्टोबरला म्हणजेच दिवाळीच्या दोन दिवस आधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तरुणांशी संवाद साधतील. यादरम्यान ते ७५ हजार तरुणांना रोजगाराची ‘भेट’ही देणार आहेत. ७५ हजार तरुणांना विविध मंत्रालये आणि सरकारी खात्यांमध्ये नियुक्तीपत्र दिले जाणार असल्याची माहिती आहे.
नोकरी कुठे मिळेल?
संरक्षण मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, पोस्ट विभाग, गृह मंत्रालय, कामगार आणि रोजगार मंत्रालय, CISF, CBI, कस्टम, बँकिंग यासह इतर अनेक क्षेत्रात तरुणांना नोकऱ्या जाहीर केल्या जातील. देशातील अनेक केंद्रीय मंत्रीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, उद्योगमंत्री पीयूष गोयल, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अवजड उद्योग मंत्री महेंद्र पांडे, आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा, पंचायती राज मंत्री गिरिराज सिंह याशिवाय इतर अनेक मंत्री विविध शहरातून कार्यक्रमाचा भाग असणार आहेत. त्याचबरोबर सर्व खासदार त्यांच्या मतदारसंघातून सहभागी होणार आहेत.
Mega Good News PM Narendra Modi Recruitment Announcement
Job Vacancy Employment Diwali