बुधवार, सप्टेंबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

तुमचा मेडिक्लेम नाकारला… हे आहेत तुमच्याकडे पर्याय… बिल्कुल घाबरु नका… बिनधास्त नडा…

by Gautam Sancheti
एप्रिल 3, 2023 | 10:02 pm
in इतर
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– जागो ग्राहक जागो –
मेडिक्लेम नाकारला तर…

सध्याच्या धकाधकीच्या युगात मेडिक्लेम (आरोग्य विमा) घेणे आवश्यक झाले आहे. मात्र, हा विमा घेऊनही वेळेप्रसंगी तो कामी येत नाही किंवा क्लेम नाकारला तर काय करावे याची बहुतांश जणांना माहिती नाही. तुमच्याकडे कोणते पर्याय आहेत, अधिकार आहेत, हे जाणून घेणे आवश्यक आहे. आज आपण त्याविषयीच चर्चा करु….

IMG 20220513 WA0011
विजय सागर
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य,
(अखिल भारतीय ग्राहक पंचायत) मो. 9422502315

ग्राहक जेव्हा आरोग्य विमा साठी एखादी कंपनी निवडतो तेव्हा त्या कंपनीचे ट्रॅक रेकॉर्ड तपासत नाही. केवळ कंपनीचे जे दलाल/एजंट असतात त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन कंपनी मध्ये पैसे भरतात. वास्तविक ग्राहक हा राजा आहे आणि त्याने डोळसपणे कंपनी निवडली पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी जसे सल्ला मसलती साठी आष्ठ प्रधान नेमले होते अगदी तसेच ग्राहकाने राजा म्हणून विविध एजंट, विमा कंपनी याचा अभ्यास करूनच, माहिती घेऊनच विमा कंपनी निवडली पाहिजे.

आता आपण गुगल द्वारे देखील असा सर्व्हे करू शकतो. फक्त एकच लक्षात घ्या की काही मोठे एजंट आहेत ते आपण गुगल सर्च केले की लगेच त्यांना गुगल द्वारे माहिती पुरवली जाते आणि नंतर प्रचंड प्रमाणात या विमा कंपनीचे एजंट चे फोन यायला सुरुवात होते. तेव्हा लगेच त्यास भुलू नका.

जो जो फोन करतो त्यास आपण आरोग्य विमा देणार त्या बाबत माहिती ईमेल वर द्या असे सांगा. तोंडी माहितीवर विश्वास ठेऊ नका.
कोण कोणते आजार यात समाविष्ट आहेत, कोणते आजार समाविष्ट नाहीत, जुन्या आजारास (प्री एक्सिस्टिंग डीसिज) मेडिकल क्लेम मिळणार का आणि मिळाल्यास किती किती वर्षांनी मिळणार याची माहिती घ्या. नो क्लेम बोनस मुळे आपली विमा हप्ता रक्कम कमी होणार की त्यामुळे विमा कवच वाढणार याची माहिती घ्या.

आपण आयआरडीए चे वेब साईट वर जाऊन सदर कंपनी बाबतची माहिती करून घ्या. त्यात सदर कंपनीने किती प्रमाणात दावे सोडवले आहेत आणि किती नाकारले आहेत हेही माहिती करून घ्या.
पॅनलवर हॉस्पिटल किती आहेत याचीही माहिती करून घे. ही हॉस्पिटल आपण राहता त्याच्या जवळ आहेत का?
मेडिकल क्लेम साठी थर्ड पार्टी एजंट कंपनीने नेमले आहेत का त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड पण तपासून घे.

विविध ग्राहक आयोगात विमा बाबत खूप प्रमाणात दावे प्रलंबित आहेत तेव्हा ग्राहक राजा सजग हो, मेडीक्लेम मध्ये खूप बारीक सारीक गोष्टी असतात त्यासाठी तज्ञ लोकांची अवश्य मदत घे.
आता काही कंपनी या कॅश लेस कार्ड देतात तरीही कधी कधी काही आजारामध्ये कॅश लेस सुविधा देत नाहीत.
ग्राहकांना असे सांगितले जाते की आपण हॉस्पिटलला पैसे द्या आणि बिल घेऊन मेडिक्लेम साठी आर्ज करा.

पॉलिसीधारक ग्राहक हॉस्पिटल चे बिल भरतो, त्यासाठी लागणारी रक्कम बाहेरून उभी करतो आणि पॉलिसी साठी क्लेम करणारा अर्ज, बिले, डॉक्टर चे प्रिस्क्रीप्शन, डिस्चार्ज कार्ड इत्यादी जमा करून जेंव्हा मेडिक्लेम साठी प्रस्ताव दाखल करतो, तेंव्हा काही विमा कंपनी या फक्त कागदपत्रे बघून, *”आमच्या वैद्यकीय टीमने सदर पेशंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज नव्हती असा अभिप्राय दिला आहे. सबब प्रस्ताव अमान्य.”* असा मेसेज पाठवून देतात आणि प्रस्ताव नाकारला जातो.

वास्तविक हे ग्राहकासाठी अत्यंत अन्यायकारक आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये ज्या डॉक्टरच्या सेवा आपण घेत असतो, त्याच्या म्हणण्या नुसारच ग्राहक हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होतो.
मग हॉस्पिटल चे डॉक्टर नी हॉस्पिटल मध्ये दाखल करून घेणेचा सल्ला चुकीचा दिलेला असतो का असा प्रश्न पडतो.

डॉक्टर विरूद्ध ग्राहक शक्यतो संघर्ष टाळतो. पण यामुळे ग्राहकाची होणारी पिळवणूक, छळवणूक वाढते. ग्राहकाला खूप मनस्ताप होतो शिवाय त्याचे अतोनात नुकसान होते. आधीच पॉलिसी साठी दर वर्षी प्रचंड प्रमाणात पैसे दिलेले असतात. हॉस्पिटल चे बिल पॉलिसी असल्यामुळे खूप जास्त प्रमाणात आलेले असते. पॉलिसी पाहून हॉस्पिटल बिल आकारात असतात.

वास्तविक जेव्हा विमा कंपनीचे पॅनल वरील हॉस्पिटल असते तेव्हा तिथे विमा कंपनी ने आधीच दर निश्चित केलेले असतात. एक करारनामा केलेला असतो आणि त्या बर हुकूम सेवा मिळाली पाहिजे परंतु हॉस्पिटल प्रशासन हे यात ग्राहकास वेठीस धरतात तसेच विमा कंपनी पण ग्राहकास वेठीस धरतात.
तेव्हा ग्राहक राजा जागा हो. जर आपणास असे विमा कंपनीने बिल देणे नाकारले असेल तर त्या विमा कंपनीला लेखी नोटीस तर देच शिवाय हॉस्पिटलला आणि डॉक्टरना पण नोटीस दे आणि खालील प्रमाणे मागणी कर.

मला हॉस्पिटल मध्ये दाखल करून देणेचा सल्ला चुकीचा दिला आहे असे विमा कंपनी चे पॅनल मधील डॉक्टर यांचे म्हणणे आहे. तेव्हा मला विनाकारण हॉस्पिटल मध्ये दाखल करून नाहक त्रास दिला गेला आहे असे सकृत दर्शनी वाटते तरी आपण मला माझे भरलेले सर्व पैसे शिवाय माझे ऍडमिशन मुळे झालेले इतर नुकसान जसे रजा, घरच्या लोकांना आणि मला झालेला मनस्ताप, आर्थिक नुकसान इत्यादींची भरपाई मागा.

तसेच विमा कंपनीस देखील नोटीस देऊन आपण ग्राहकास विमाचे पैसे देणे टाळणे साठी असे नमूद केले असावे असे सकृत् दर्शनी वाटते तरी आपण आपल्या पॅनल वरील डॉक्टरांनी जे नोटिग दिले आहे त्याची प्रत द्यावी, तसेच नोटिंग करणाऱ्या डॉक्टर मंडळीचे नाव, पत्ता इत्यादी द्यावे, हॉस्पिटल प्रशासनाने मला जर चुकीचा सल्ला दिला आहे असे आपणास वाटते आहे तर आपल्या पॅनल मधून सदर हॉस्पिटल काढून टाकावे, आपल्यात आणि हॉस्पिटल मध्ये जो करार झाला आहे त्याची प्रत मला द्यावी कारण शेवटी असा करारनामा आपण ग्राहकांना सेवा मिळणे साठीच करत असता आणि ग्राहकानी दिलेल्या वार्षिक पॉलिसी हप्त्यातुंनच आपण सदर करार नामा केला आहे तेव्हा तो मिळणे माझा अधिकार आहे.

तसेच आपण विमा कंपनी चे डॉक्टर आणि हॉस्पिटल डॉक्टर यांची तक्रार इंडियन मेडिकल कौन्सिल तसेच महाराष्ट्र राज्य मेडिकल कौन्सिल यांच्या कडे पण करा आणि विचारा की यातील कोणते डॉक्टर खरे बोलतात आणि कोणते खोटे.
तसेच अशा दोन्ही डॉक्टरवर, हॉस्पिटल वर आणि विमा कंपनी वर ग्राहक आयोगात केस दाखल करावी आणि आपण रुग्ण म्हणून आणि पॉलिसी होल्डर म्हणून या सर्वांचे ग्राहक आहोत हे लक्षात घ्या. शिवाय काही परिस्थितीत आपण अशा बे जबाबदार डॉक्टर वर पोलिसात गुन्हा नोंदवून क्रिमिनल केस देखील करू शकता कारण आपले पैसे काढून घेणे साठी किंवा आपल्याला विमा चे पैसे देणे टाळण्यासाठी चुकीचा सल्ला दिला आहे हे सिद्ध होते.

ग्राहक राजा सध्या *विमा कंपन्यांकडून मेडिक्लेम नाकारण्याचे प्रमाण खूप वाढत आहे. ग्राहकाचा मेडिक्लेम असूनही, त्यासाठी हजारो रुपये हप्ता भरूनही, त्याचा पुन्हा वैयक्तिक खर्च होतो व नाहक मनस्तापही होतो* तरी गप्प बसून सहन करू नका. अशा दुष्ट प्रवृत्तीना वेळीच ठेचले पाहिजे. अन्याय सहन करून ग्राहक इतर ग्राहकांना लुटणे साठी अशा विमा कंपनी किंवा हॉस्पिटल ना मोकळे रान देता कामा नये.

लक्षात ठेवा हॉस्पिटल आणि डॉक्टर वर केसेस दाखल होणार हे गृहीत धरूनच प्रत्येक रुग्णांकडून काही प्रमाणात जास्त पैसे आकारणी करून त्यासाठी देखील वेगळे विमा संरक्षण सद्या डॉक्टर आणि हॉस्पिटल घेत आहेत असे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या लक्षात आले आहे. कित्येक हॉस्पिटल आणि डॉक्टरचे केसेस मध्ये विमा कंपनीचेच वकील त्यांची बाजू मांडत असतात असे आमच्या निदर्शनास आले आहे. ग्राहक संघटित नाहीत आणि आगातिक आहेत याचा फायदा घेतला जात आहे तरी आपण ग्राहक म्हणून संघटित होणे साठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे सदस्य व्हा.

आपणास काहीही मदत लागली तर अगदी मोफत मार्गदर्शन साठी संपर्क साधा.
आमची वेबसाईट : www.abgpindia.com
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा: *दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०*

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
विजय सागर 9422502315
श्री विलास लेले 9823132172
सौ अंजली देशमुख 9823135803
श्रीमती विजया वाघ 9075132920
श्री रवींद्र वाटवे 9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909
श्रीमती सई बेहरे 9890099982
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी 7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675

*ठाणे*- श्रीमती स्मिता जामदार 9819438286,
श्री दिपक सावंत 9833398012
*डोंबिवली* श्री राजेंद्र बंडगर 9975712153
,*नागपूर*, श्री विलास ठोसर 7757009977
*कोकण प्रांत* सौ वेदा प्रभूदेसाई 9075674971
*देवगिरी परभणी* श्री विलास मोरे 09881587087
*कोल्हापूर* ऍड.सुप्रिया दळवी, मो.7038887979
*सांगली* श्री.सर्जेराव सूर्यवंशी, मो.9763722243
*सातारा* श्री जयदीप ठुसे, 9767666346

*सोलापूर* श्री.शशिकांत हरिदास, मो.9423536395
*पंढरपूर 9403293291
*जळगांव* डॉ. अनिल देशमुख, मो.7588011327
*नगर* श्री. अतुल कुऱ्हाडे, मो.9420642021
*नाशिक* श्री. तुळशीराम सांळुके, मो. 9422259089
श्री. रविंद्र अमृतकर, मो. 8412995454
*धुळे* श्री. हरीश जाधव, मो. 7798439555
*नंदुरबार* श्रीम.वदंना तोरवणे, मो .9156972786

Mediclaim Rejection Alternative Consumer by Vijay Sagar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आज या व्यक्तींच्या मनाजोगे घडेल; जाणून घ्या, मंगळवार, ४ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

Next Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

rain1
संमिश्र वार्ता

राज्यात अशी असेल पावसाची स्थिती…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 10, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागात पार्क केलेल्या चार मोटारसायकली चोरीला

सप्टेंबर 10, 2025
crime 88
क्राईम डायरी

घरफोडीची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात झालेल्या तीन घरफोडींमध्ये चार लाखाचा ऐवज लंपास

सप्टेंबर 10, 2025
crime11
क्राईम डायरी

फ्रॉडची ९ लाख ८० हजाराची रक्कम मुळ मालकास परत…नाशिकच्या सायबर शाखेस यश

सप्टेंबर 10, 2025
Untitled 8
महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांच्यात अडीच तास चर्चा…दसरा मेळाव्यात युतीची घोषणा होणार?

सप्टेंबर 10, 2025
Untitled 7
महत्त्वाच्या बातम्या

समृध्दी महामार्गावर रस्त्यावर खिळे, गाड्या पंक्चरमुळे गाड्यांची रीघ

सप्टेंबर 10, 2025
Screenshot 20250910 114142 Collage Maker GridArt
संमिश्र वार्ता

मालेगावमध्ये शिक्षक भरती घोटाळा…तीन शिक्षण अधिका-यांना अटक

सप्टेंबर 10, 2025
modi 111
संमिश्र वार्ता

पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या पोस्टला दिले हे उत्तर…

सप्टेंबर 10, 2025
Next Post
Vichar Dhan

इंडिया दर्पण - विचार धन - वाचा आणि नक्की विचार करा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011