रविवार, ऑक्टोबर 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राज्याच्या वैद्यकीय क्षेत्रात तब्बल ५ हजार पदांची भरती; मंत्री गिरीश महाजनांची घोषणा

मे 2, 2023 | 12:56 pm
in संमिश्र वार्ता
0
140x570 1

 

नांदेड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील कोणताही व्यक्ती उपचारापासून वंचित राहू नये, गरिबाला मोफत उपचार उपलब्ध व्हावेत ही शासनाची भूमिका आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय सेवा-सुविधा भक्कम व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सर्वसामान्यांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यादृष्टिने आम्ही प्रत्येक जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालयासमवेत नर्सिंग कॉलेज देण्याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.

येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ई.सी.आर.पी. अंतर्गत नूतनीकरण करण्यात आलेल्या दोन अद्ययावत हृदयरोग अतिदक्षता कक्षाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार राजेश पवार, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे, प्रवीण साले आदी मान्यवर उपस्थित होते.

वैद्यकीय सेवा-सुविधेसाठी उपलब्ध करून दिलेला निधी हा सर्वसामान्यांच्या जीवाशी निगडीत असतो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय हे वैद्यकीय सेवेचे द्योतक आहे. हे लक्षात घेता जी काही विकास कामे घेतली जातात अथवा पूर्ण केली जातात त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड असता कामा नये. जे काम करू ते भविष्यासाठी उत्तमच करू ही धारणा वैद्यकीय क्षेत्रात प्रत्येकाजवळ असणे आवश्यक आहे. एखादा वार्ड, कक्ष जेंव्हा निर्माण होतो तेंव्हा त्यात कोणत्याही प्रकारच्या उणिवा असता कामा नये याची दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केल्या.

अपुरे मनुष्यबळ याची मला कल्पना आहे. दवाखाणा आणि स्वच्छता या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. रुग्णांना केवळ चांगले उपचार व सुविधा देऊन चालत नाही तर तितक्याच चांगल्या स्वच्छतेच्या सुविधाही आवश्यक असतात. प्रत्येक वार्डाची स्वच्छता असलीच पाहिजे. याचबरोबर रुग्णांना मनोधैर्य देण्यासाठी डॉक्टरांपासून सर्व कर्मचाऱ्यांनी आस्थेवाईकपणे रुग्णांची विचारपूसही केली पाहिजे. शासकीय वैद्यकीय क्षेत्रात हे तत्व पाळल्या जाते याचे मला समाधान असल्याचे पालकमंत्री गिरीष महाजन म्हणाले. याचबरोबर मनुष्यबळाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन येत्या दीड महिन्यात सुमारे 5 हजार कर्मचारी नियुक्त केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वैद्यकीय सेवासुविधा हा मी माझ्या कर्तव्य तत्परतेतून जपलेल्या आस्थेचा भाग आहे. एखाद्या रुग्णाला झालेले आजार व त्याच्या उपचारासाठी होणारा कोंडमारा मी दररोज अनुभवतो. गेल्या 30 वर्षांपासून सर्वसामान्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी मला जी संधी मिळाली त्या सेवेच्या संधीतूनच जनतेने सलग सहावेळा लोकप्रतिनिधी म्हणून जवळ केल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. वरचेवर महिलांमधील वाढत जाणारे कॅन्सरचे आजार याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. याचबरोबर व्यसनाधिनतेमुळे होणाऱ्या कर्करोगाकडे त्यांनी लक्ष वेधले. वैद्यकीय सेवा-सुविधा व उपचारासाठी रुग्णालय अत्यावश्यक असली तरी केवळ आपल्या व्यवसनामुळे जर आजार वाढत असतील तर त्याही दृष्टीने समाजाने विचार केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी स्टाफ नर्स / परिचारिका, स्वच्छता कर्मचारी, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, डॉक्टर्स व विविध संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे व सूचना ऐकून घेतल्या. सर्वांशी सुसंवाद साधून त्यांनी आपल्या भेटीत काही वार्डांची अनपेक्षित स्वच्छतेची पाहणी करून संबंधितांना सूचना दिल्या.

Medical Sector 5 Thousand Post Recruitment in Maharashtra

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खासगी कंपन्यांचे पेट्रोल स्वस्त का आहे? सरकारी कंपन्या दर केव्हा घटवणार?

Next Post

आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांची मोठी घोषणा; राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

IMG 20251018 WA0011
महत्त्वाच्या बातम्या

कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प…

ऑक्टोबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा दिवस… जाणून घ्या, १९ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 18, 2025
IMG 20251018 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या सामन्यात… महाराष्ट्राचा सौराष्ट्र वर १० गडी राखून दणदणीत विजय…

ऑक्टोबर 18, 2025
tejas
महत्त्वाच्या बातम्या

शत्रूला धडकी भरवणारे असे आहे तेजस लढाऊ विमान… मेक इन इंडियाचा बोलबाला…

ऑक्टोबर 17, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर घरबसल्या खरेदी करा सोने आणि मिळवा १० लाखांपर्यंतचे बक्षिस….

ऑक्टोबर 17, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरातील २८ ठिकाणची एकत्रित पार्किंग निविदा वादात…

ऑक्टोबर 17, 2025
organ donation
महत्त्वाच्या बातम्या

भावनिक क्षण… आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण…

ऑक्टोबर 17, 2025
IMG 20251017 WA0049
मुख्य बातमी

ओझर येथील कार्यक्रमात ‘तेजस’ लढाऊ विमानासह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित…

ऑक्टोबर 17, 2025
Next Post
Sharad Pawar e1682095791922

आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांची मोठी घोषणा; राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011