शुक्रवार, डिसेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

भारतात कुठेही वैद्यकीय आपत्तीमध्ये अडकलेल्या रुग्णांना त्वरित मिळणार मदत; फक्त हे करा

मे 19, 2022 | 5:28 pm
in राज्य
0
what3words Medulance Callout 1x1

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वैद्यकीय आपत्तीमध्ये अडकलेल्या व्यक्तींना वेळेवर मदत मिळणे आवश्यक असते तसे झाले नाही तर संबंधितांचा जीव जाण्याची मोठी भीती असते. मात्र, आता देशात कुठेही वैद्यकीय आपत्तीत अडकलेल्या रुग्णांना त्वरीत मदत मिळणार आहे. त्यासाठी मेड्युलन्स या कंपनीने पुढाकार घेतला आहे.

भारताची तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी पहिली आपत्कालीन प्रतिसाद सेवा पुरवठादार कंपनी मेड्युलन्सने आज व्हॉट३वर्ड्स (what3words) च्या यशस्वी अंमलबजावणीची घोषणा केली. भारतभरात कुठेही वैद्यकीय आपत्तीमध्ये अडकलेल्या रुग्णांना देण्यात येणा-या प्रतिसादाचा वेग वाढविणे या भागीदारीमुळे कंपनीला शक्य झाले आहे. व्हॉट३वर्ड्सच्या मोफत अॅपच्या साथीने रुग्णांना अगदी अचूकपणे घटनेची जागा ओळखता येईल व त्याठिकाणी मदत मागवता येईल. अगदी इंटरनेट कनेक्शन फारसे चांगले नसलेल्या भागांतूनही ही माहिती त्यांना पाठवता येऊ शकेल.

मेड्युलन्सने ६० शहरांमध्ये आपल्या ७,५०० रुग्णवाहिकांचा ताफा तैनात केला आहे आणि सरकारच्या दिल्लीतील १०२ रुग्णवाहिकांच्या ताफ्याचा भाग असलेल्या आपत्कालीन सेवा पुरवठादार कंपन्यांमध्ये मेड्युलन्सचा समावेश आहे. याखेरीज कंपनीद्वारे त्यांच्या ग्राहकांनाही एका खास हेल्पलाइनच्या मदतीने सेवा उपलब्ध करून दिली जाते. वेगवान व तत्पर सेवापुरवठा आणि मागणीस प्रतिसाद देण्यासाठी लागणारा कमीत कमी वेळ यांच्या साथीने वैद्यकीय दळणवळणाच्या क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणणे हे मेड्युलन्सचे लक्ष्य आहे.

व्हॉट३वर्ड्स ने पृथ्वीचा संपूर्ण पृष्ठभाग ३ मी. x ३मी. च्या चौरसांच्या जाळीमध्ये विभागला आहे. यातील प्रत्येक चौरसाला तीन रँडम शब्दांचा असाधारण मेळ घालत तयार करण्यात आलेले नाव दिले आहे ज्याला व्हॉट३वर्ड्स पत्ता असे म्हटले जाते. उदाहरणार्थ ///setting.adjusted.derailed हा पत्ता तुम्हाला नवी दिल्लीतील एम्स जय प्रकाश नारायण अपेक्स ट्रॉमा सेंटरच्या प्रवेशद्वाराशी घेऊन जाईल. व्हॉट३वर्ड्स अप हे आयओएस आणि अँड्रॉइड अशा दोन्ही प्रकारच्या उपकरणांवरून विनामूल्य डाऊनलोड करता येते. ते ऑफलाइनही काम करत असल्याने डेटा कनेक्शनचा भरवसा नसलेल्या भागांतही वापरण्यास ते अत्यंत उपयुक्त आहे. what3words चा वापर त्यांच्या ऑनलाइन मॅपच्या आधारे करता येईल.

मेड्युलन्सचे सह-संस्थापक प्रणव बजाज म्हणाले, “जिथे तत्काळ प्रतिसाद देणे हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे अशा उद्योगक्षेत्रामध्ये काम करताना व्हॉट३वर्ड्सच्या तत्पर, अत्यंत सहजतेने संवाद साधता येईल अशा आणि लोकेशन आधारित सेवेच्या मदतीने कमीत कमी वेळात प्रतिसाद देणे मेड्युलन्सला शक्य होत आहे. मेड्युलन्सला अगदी अखंड सेवा पुरवित १० मिनिटांहून कमी काळात प्रतिसाद देता येत आहे. इतर डेटा-आधारित पद्धतींबरोबरच व्हॉट३वर्ड्स ने मेड्युलन्सला अधिक आयुष्य वाचविण्याच्या कामी, अधिक जणांना सहाय्य करण्याच्या कामी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एखाद्या व्यक्तीने थेट आमच्या हेल्पलाइनवर फोन केला तरीही व्हॉट३वर्ड्समुळे आम्ही कोणत्याही स्मार्ट अॅप्लिकेशनच्या शिवायही त्यांचा पत्ता अचूकपणे शोधू शकतो.”

व्हॉट३वर्ड्स तंत्रज्ञान हे युके, यूएस, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, बेल्जियम, ऑस्ट्रीया, सिंगापूर, कॅनडा, भारत आणि दक्षिण आफ्रिका येथील १२० हून अधिक इमर्जन्‍सी सर्विसेस् कंट्रोल केंद्रांकडून मदतीची गरज असलेल्या लोकांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी आधीच वापरले जाऊ लागले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

संतापजनक! पत्नीला मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले; पतीसह दोघांवर गुन्हा दाखल

Next Post

…म्हणून उद्धव ठाकरेंची औरंगाबादेत त्याच मैदानावर भव्य जाहीर सभा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
संग्रहित फोटो

...म्हणून उद्धव ठाकरेंची औरंगाबादेत त्याच मैदानावर भव्य जाहीर सभा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011