नवी दिल्ली – वैद्यकीय शिक्षणासाठी (मेडिकल) होणारी प्रवेश परीक्षा (नीट) पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी जाहिर केला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही परीक्षा येत्या १८ एप्रिल रोजी प्रस्तावित होती. ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनाने थैमान सुरू केल्याने सीबीएसई बोर्डानेही दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत तर १२वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. महाराष्ट्र सरकारनेही १०वी व १२वीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत.
https://twitter.com/drharshvardhan/status/1382690777399226369