इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या नेत्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. उपराज्यपाल सक्सेना मानहानीबाबतच्या तक्रारीनंतर त्यांच्याविरोधात कोर्टाने अटक वॅारंट काढले होते. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी अटक केली.
मेधा पाटकर यांना निजामुद्दीन भागातून ताब्यात घेण्यात आले. साकेत कोर्टात त्यांना हजर केले जाणार आहे. दिल्लीचे विद्यमान राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांच्या मानहानीच्या प्रकरणात पाटकर दोषी आढळल्या होत्या. त्यानंतर त्यांच्याविरुध्द अजामीनपात्र वाॅरंट जारी केले. २३ एप्रिलला त्यांना न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. पण, त्या हजर राहिल्या नाही.
पाटकर यांना २३ वर्षे जुन्या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली. पण, त्याचं वय आणि आरोग्य लक्षात घेता त्यांना तुरुंगवासाच्या शिक्षेतून सूट देण्यात आली. पण, नुकसानभरपाई आणि बॅान्ड भरण्याचे आदेश दिले होते.