नाशिक – शेतकरी,शेतमजूर गेले दहा महिने दिल्लीच्या सीमेवर लढत आहे. मात्र त्यांच्या मागण्याकडे चर्चा करायला केंद्र सरकारकडे वेळ नाही. पंतप्रधान मोदी यांची खुर्ची सोडली तर देशातील सर्व साधन संपदा यांनी भांडवलदारांना कवडीमोल भावाने विकलेली आहे. आपल्या देशाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेला सविधान हे सुद्धा धोक्यात आलं असून त्या संविधानाला बदलण्याची प्रक्रिया गुप्त पद्धतीने या सरकारने सुरू केलेली आहे. शेतकरी, कामगार व विद्यार्थी यांनी एकत्र येऊन या सरकारच्या विरोधात लढले पाहिजे असे आवाहन जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केले.
गंजमाळ येथील रोटरी क्लबच्या सभागृहात वर्कर्स फेडरेशन नाशिकचा झोनने आयोजित केलेल्या भव्य कामगार मेळावा व स्वातंत्र्यसैनिक कॅा. माधवराव गायकवाड बहुउद्देशीय संस्था मनमाडच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळयात त्या बोलत होत्या. यावेळी मेधा पाटकर म्हणाल्या की, गेल्या सात वर्षात या सरकारने सुरू केलेली आहे. वीज क्षेत्रात नाही तर संपूर्ण सरकारच्या मालकीचे क्षेत्र खाजगी भांडवलदारांना विकण्याच्या षड्यंत्र सरकारने सुरु केले असून अनेक सरकारच्या मालकीचे उद्योग त्यांनी खाजगी भांडवलदारांना विकलेला आहे. सत्तेवर असलेल्या सरकार काही मोजक्या भांडवलदारांचा साठी काम करत असून इतर क्षेत्रातील लढणाऱ्या लोकांचा आवाज दाबल्या जात आहे. तुम्ही आम्हाला मारा,गोळ्या घाला मात्र आणि तुमच्या विरोधात संघर्ष करू तुम्ही चालवलेली जनतेच्या उद्योगाची लूट हे लोकांच्यापुढे मांडल्या शिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. वीज क्षेत्रात सध्या सुधारित विद्युत कायदा २०२१ आणून हे क्षेत्र सुद्धा खाजगी भांडवलदारांना विकण्याचा प्रयत्न चालवलेला असून त्याला कडाडून विरोध देशातील चारशेच्या वर शेतकरी संघटना करत आह. केंद्र सरकारने ४४ कामगार कायद्याचे बदललेले आहे.त्या बदलास सुद्धा शेतकरी आंदोलनाचा विरोध आहे. विद्युत कायदा २०२१ संसदेत पास होऊ नये याकरता सुद्धा शेतकरी संघटना लढत आहे.पुढील काळामध्ये शेतकरी व कामगार यांनी एकत्र येऊन केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे.
वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कृष्णा भोयर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते मिलिंद रानडे, आयटक नेते कॉम्रेड राजू देसले, अतिरिक्त सरचिटणीस महेश जोतराव, उपाध्यक्ष कॉम्रेड एस.आर.खतिब, उपसरचिटणीस अरुण मस्के, सलाउद्दीन नाकाडे, संयुक्त सचिव जि.एच.वाघ, महिला आघाडी अध्यक्षा भांरतीताई भोयर, स्वातंत्र्यसैनिक कुसुमताई गायकवाड, माधवराव गायकवाड यांच्या कन्या साधना गायकवाड, नाशिक मधील इतर पदाधिकारी व्यासपीठावर विराजमान होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रमुख पाहुणे व इतर मान्यवर यांचे आगमन होताच इन्कलाब जिंदाबाद, लाल झेंडा जिंदाबाद, लढेंगे जितेंगे, कामगार एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या.