मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेअर बाजारात एखाद्या बातमीमुळे एखाद्या कंपनीची अचानक भरभराट होते, असे दिसून येते तर काही वेळा त्याउलट देखील परिस्थिती होऊ शकते. FMCG क्षेत्रातील दिग्गज हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) लवकरच सुप्रसिद्ध मसाला ब्रँड महाशियान दी हट्टी म्हणजेच MDH मधील भागभांडवल खरेदी करू शकते. या वृत्तानंतर एचयूएलच्या शेअरमध्ये मोठी विक्री झाली आहे.
मंगळवारच्या व्यवहारादरम्यान हिंदुस्थान युनिलिव्हरच्या शेअरची किंमत चार टक्क्यांनी घसरून 1990 रुपयांच्या खाली गेली. त्याच वेळी, बाजार भांडवलात ते 4 लाख 68 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. त्याच महिन्यात 8 मार्च रोजी शेअरची किंमत 1,901.80 रुपयांवर गेली, जी 52 आठवड्यांची नीचांकी आहे.
एका रिपोर्टनुसार, हिंदुस्तान युनिलिव्हर बहुसंख्य स्टेक खरेदी करण्यासाठी MDH Spices सोबत बोलणी करत आहे. तसेच MDH चे मूल्यांकन 10 ते 15 हजार कोटी रुपयांच्या दरम्यान असू शकते. मात्र, या अहवालांवर हिंदुस्थान युनिलिव्हर आणि MDH स्पाइसेसकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
सध्या हिंदुस्तान युनिलिव्हरने आपले व्यवस्थापन बदलले आहे. कंपनीने आपल्या व्यवस्थापन समितीमध्ये मधुसूदन राव आणि दीपक सुब्रमण्यम यांचा समावेश केला आहे. त्याच वेळी, कंपनीच्या तिमाही निकालांबद्दल बोलताना, 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत स्वतंत्र निव्वळ नफ्यात दर वर्षी16.8 टक्के वाढ झाली आहे.
कंपनीचा नफा 2,243 कोटी रुपयांवर पोहोचला होता. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीने 1,921 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. गेल्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीत 11,959 कोटी रुपयांच्या तुलनेत महसूल 10.2 टक्क्यांनी वाढून 13,183 कोटी रुपये झाला आहे.