नवी दिल्ली – केवळ भारतच नाही तर परदेशातही प्रसिद्ध असलेल्या एमडीएच या मसाला ब्रँडचे संस्थापक आणि ज्येष्ठ उद्योजक महाशय धर्मपाल गुलाटी (९८) यांचे निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ते त्यातून बरे झाले. पुन्हा त्यांना त्रास सुरू झाला. त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत आज पहाटे मालवली.
मसाल्याचे दुकानदार ते उद्योगाचे संस्थापक अशी त्यांची कारकीर्द आहे. पाकिस्तानात त्यांना जन्म झाला होता. फाळणीनंतर ते भारतात आले. त्यांचे शिक्षण केवळ चौथी उत्तीर्ण एवढेच होते. त्यांनी मसाला व्यवसाय सुरू केला. आज त्यांचे भारत व दुबईत मसाला उत्पादन कारखाने आहेत. जगातील अनेक देशांमध्ये एमडीएच मसाल्याची विक्री होते. त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. सामाजिक कार्यातही ते अग्रेसर होते.