विशेष प्रतिनिधी, मुंबई
एमबीबीएसच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा आता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचं प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज सांगितलं आहे. वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्रावर येणंजाणं किंवा अन्य ठिकाणी जाण्यात बऱ्याच अडचणी येत होत्या. शिवाय अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. हे सर्व पाहता परीक्षा पुढं ढकलणं शक्य असल्यानं, आम्ही हा निर्णय घेतला. असं अमित देशमुख यांनी सांगितलं आहे.
राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील सुमारे ४५० प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि त्यांच्या संपर्कातील ३५० जण करोना संसर्गाने ग्रासलं आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात, तसंच १९ एप्रिलला सुरू होणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून करण्यात आली होती