आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नांना यश
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात एमबीएच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या नाशिक सह राज्यातील विविध भागात या सीईटी परीक्षांमध्ये गोंधळ झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या नाशिक येथे सीईटी सेंटरवर ४० मिनिटे अगोदर ऑनलाईन पेपर सबमिशन बंद झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे पेपर जमा करणे देखील शक्य झालेले नव्हते या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांसह आमदार देवयानी फरांदे यांची भेट घेऊन मदत करण्याची विनंती केली होती आमदार देवयानी फरांदे यांनी देखील सदर प्रकरणाची तत्काळ दखल घेत नामदार चंद्रकांत दादा पाटील मंत्री उच्च व तंत्रशिक्षण व आयुक्त सीईटी सेल यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला तसेच लेखी पत्र देखील दिलेले होते
आज आमदार देवयानी फरांदे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येऊन तांत्रिक कारणास्तव ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आल्या नाही त्यांच्यासाठी पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय cet सेलने घेतलेला आहे. दिनांक ६/४/२०२३ ते ११/०४/२०२३ या कालावधीत पुनर परीक्षेसाठी अर्ज भरण्यात येणार असून २७/४/२०२३ रोजी पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळलेले आहे