मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एप्रिल महिना संपून मे महिना सुरू झाला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मे महिन्यात येणाऱ्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. संपूर्ण महिन्यात एकूण 12 दिवस बँका बंद राहणार असून मे महिन्याच्या सुरुवातीला सलग चार दिवस बँकांमध्ये कोणतेही कामकाज होणार नाही. त्यामुळे बँकिंगच्या कामासाठी जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी नक्की तपासा.
बँकेशी संबंधित काही महत्त्वाचे काम असेल तर ते या पाच दिवसांतच मिटवा. कारण मे महिन्याच्या सुरुवातीला सलग चार दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाही. वास्तविक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मे 2022 साठी सुट्टीचे कॅलेंडर जारी केले आहे.
1 ते 4 मे पर्यंत सुट्टी
नागरिकांनी हे लक्षात घेण्यासारखे आहे की, आरबीआयच्या कॅलेंडरनुसार, मे महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच मे दिनानिमित्त बँका बंद राहतील, हा दिवस महाराष्ट्र दिन देखील आहे. याशिवाय 2 मे रोजी परशुराम जयंतीनिमित्त अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेल. 3 आणि 4 मे रोजी ईद उल फित्र निमित्त सुट्टी असेल.
एकूण 12 दिवस बँका बंद
मे महिन्यात बँकेच्या कामासाठी घराबाहेर जावे लागत असेल, तर या महिन्यात येणाऱ्या सुट्ट्यांवर आधी लक्ष ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या संपूर्ण महिन्यात एकूण 12 दिवस बँकेचे काम बंद राहणार आहे, मात्र या दिवसात ऑनलाइन बँकिंग सुविधा वापरता येणार आहे. या सुट्ट्या राज्यानुसार बदलू शकतात, कारण त्यांची यादी देशभरातील विविध राज्यांमध्ये आणि राज्यांमध्ये साजरे होणाऱ्या सणांनुसार तयार केली जाते.
मे २०२२ मधील बँक सुट्ट्यांची यादी अशी
1 मे रविवार – मे दिन – महाराष्ट्रासह देशभरात महाराष्ट्र दिन
2 मे महर्षि परशुराम जयंती – अनेक राज्यात
३ मे ईद उल फित्र, बसव जयंती -कर्नाटक
4 मे ईद उल फित्र तेलंगणा
9 मे गुरु रवींद्रनाथ जयंती – पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा
13 मे रोजी देशभरात ईद उल फित्र
14-15 मे दुसरा शनिवार-रविवार देशभरात
16 मे राज्यत्व दिन, बुद्ध पौर्णिमा -सिक्कीम आणि अनेक राज्ये
24 मे, सिक्कीममधील काझी नजरुल इस्लाम यांचा जन्मदिन
28 व 29 मे शनिवार-रविवार देशभरात सुटी