बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

एकलहरे येथील मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयाला पुणे विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार

by India Darpan
जानेवारी 27, 2025 | 6:05 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20250127 WA0242 1

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी जाहीर होणाऱ्या सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कारासाठी २०२४-२५ या वर्षात व्यावसायिक महाविद्यालयांमधून एकलहरे येथील मातोश्री शिक्षण संस्थेच्या मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे.यामुळे मातोश्रीच्या शिरपेचात अजून एक सन्मान वाढला आहे.

हा पुरस्कार विद्यापीठाकडून महाविद्यालयांच्या व्यवस्थापन कौशल्य, धोरणे, अध्यापन पद्धती, विद्यार्थी प्रगती, प्लेसमेंट यश, शिक्षकांचे अनुभव आणि संशोधन कार्य यांसारख्या अनेक महत्त्वाच्या निकषांवर आधारित दिला जातो. मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयाने या सर्वच निकषांवर उत्कृष्ट कामगिरी बजावून हा सन्मान पटकावला आहे.२००८ साली तीन शाखांसह सुरू झालेले हे महाविद्यालय आजच्या घडीला आठ शाखांतील पदवी अभ्यासक्रम, पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि पीएच.डी. संशोधन केंद्र म्हणून विकसित झाले आहे. शैक्षणिक गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असलेल्या या महाविद्यालयाने नाशिक जिल्ह्यात नॅक मानांकन मिळवणारे पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय होण्याचा मान मिळवला आहे. तसेच पाच शाखांना एनबीए मान्यता मिळाल्याने हे महाविद्यालय शैक्षणिक क्षेत्रात आदर्श ठरले आहे.यावर्षीपासून महाविद्यालयाला स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जाही प्रदान करण्यात आला आहे.नाशिक शहरापासून दूर,ग्रामीण भागात असूनही अत्यंत कमी कालावधीत स्वायत्तता दर्जा मिळविणारे महाविद्यालय म्हणून महाविद्यालयानलौकिक मिळविला आहे.

या प्रगतीचा श्रेय संस्थेचे सचिव कुणाल दराडे यांच्या सक्षम मार्गदर्शनाला आणि प्राचार्य डॉ. गजानन खराटे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाला दिले जाते.त्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनामुळे महाविद्यालयाने शिक्षण, संशोधन आणि विद्यार्थी विकासाच्या क्षेत्रात नवी उंची गाठली आहे.शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्ता आणि संशोधनात नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.संस्थेचे संस्थापक नरेंद्र दराडे व अध्यक्ष आमदार किशोर दराडे यांनी या महत्त्वपूर्ण यशाबद्दल संपूर्ण महाविद्यालयाचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा उत्कृष्ट पर्याय बनलेल्या मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयाने नाशिक जिल्ह्याच्या शैक्षणिक वैभवात मोलाची भर घातली आहे.

टीमच्या अथक परिश्रमामुळे यश“

IMG 20250127 WA0244 1

मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयाने केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर तांत्रिक शिक्षण, संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात आपली वेगळी छाप सोडली आहे. विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाचा आदर्श बनलेले हे महाविद्यालय नाशिक जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एक दीपस्तंभ ठरले आहे.प्राचार्य डॉ. गजानन खराटे आणि त्याची टीम यांचे अथक परिश्रमामुळे हे यश शक्य झाले आहे.”
कुणाल दराडे, सचिव, मातोश्री शिक्षण संस्थां

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…गुन्हे सिद्धतेकरिता देशातील पहिला उपक्रम

Next Post

नाशिक परिमंडळात १२ हजार ४१४ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत, ८४ कोटी रुपये थकबाकी…

Next Post
IMG 20250127 WA0247 2 e1737984260741

नाशिक परिमंडळात १२ हजार ४१४ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत, ८४ कोटी रुपये थकबाकी…

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्याला गती प्राप्त होईल, जाणून घ्या, बुधवार, १८ जूनचे राशिभविष्य

जून 17, 2025
Untitled 49

घोलप, बडगुजर यांच्यासह या दोन माजी महापौर व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जून 17, 2025
Corruption Bribe Lach ACB

मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एजंट एसीबीच्या जाळ्यात

जून 17, 2025
farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011