नवी दिल्ली – काही वेळा आपण मास्क लावल्यानंतरही कोरोनाची होण्याची भीती असून त्यासाठी मास्क कसा वापरावा याबाबत नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, तरच कोरोनापासून प्रतिबंध होऊ शकतो. कोरोनाची भीती असल्यास, आपला मास्क अधिक सुरक्षित बनवण्याचे मार्ग असून चेहरा आणि नाकावर जितका मास्क बसत जाईल तितका तो व्हायरसपासून वाचवेल.
या संदर्भात यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशनने कोणता सल्ला दिला आहे. चला जाणून घेऊ या…
दोन दोरांना एकत्र बांधा
चेहऱ्यावर मास्क लावताना, दोन्ही दोर किंवा लवचिक पट्ट्या एकत्र गाठून बांधून घ्या. हा मुखवटा आपला चेहरा आणि नाक पूर्णपणे लपवेल. संक्रमित हवा किंवा एरोसोल याला नाक किंवा तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करण्याचा मार्ग सापडणार नाही.
गाठी नसलेला मास्क
गाठी नसलेला सर्जिकल मास्क सुमारे 56.1 टक्के बाह्य हवा आणि एरोसोल कणांपासून संरक्षण करतो, तर कपडयाचा मास्क सुमारे 51.4 टक्के हवा, तोंडाने किंवा नाकात शिरण्यापासून कणांना प्रतिबंधित करतो.
गाठी असलेला मास्क
केवळ सर्जिकल मास्क हा 77 टक्के बाहेरील हवा आणि एरोसोल कणांना टाळण्यास सक्षम आहे. तर सर्जिकल मास्कवर आणखी कपड्याचा मास्क घालून 85.4 टक्के हवा आणि एरोसोलमध्ये अडथळा आणला जातो.
वापरताना काय करावे
मास्कच्या दोरांना अशा प्रकारे बांधा की कानाला वेदना होणार नाही, तसेच आपण आरामात श्वास घेऊ शकाल. त्याचप्रमाणे दोन मास्क लावल्याने आपल्याला बोलण्यात अडचणी येणार नाहीत, याची काळजी घ्यावी, घराबाहेर पडण्यापूर्वी घरातच मास्क लावा आणि काही गैरसोय झाली आहे का ते पहा.
वापरताना काय करू नये
एकाच्या वर दोन सर्जिकल किंवा मेडीकल मास्क घालू नका, N-95 मास्कसह इतर कोणत्याही प्रकारचे मास्क लावू नका, मास्कवर कोणत्याही प्रकारे जंतुनाशक फवारणी करु नका, गलिच्छ किंवा वापरलेले मास्क वापरल्याने कोणतेही संरक्षण मिळणार नाही.
डबल मास्कने संरक्षण
अमेरिकन सीडीसीने त्यांच्या अभ्यासानुसार असे आढळले आहे की, दोन मास्क लावल्याने कोरोना संक्रमणाचा धोका 95 टक्के टळतो. शास्त्रज्ञांनी याला ‘डबल मास्किंग’ म्हटले आहे, ज्यामुळे शरीरात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात गुंतलेल्या व्हायरसमुळे दुहेरी अडथळा निर्माण होतो.