वॉशिंग्टन – ऑनलाईन डेस्क
अन्न, वस्त्र, निवारा या अत्यावश्यक मुलभूत गरजांप्रमाणेच आजच्या कोरोना काळात मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिजन-औषधे या गोष्टी देखील जीवनातील अत्यावश्यक किंवा महत्त्वाचा भाग बनला आहे. आपल्या देशात सध्या याच गोष्टींची चर्चा सुरू आहे. परंतु अमेरिकेत मात्र ज्या लोकांनी लसी घेतली आहे त्यांना बाहेर जातांना मास्क लावणे आवश्यक नाही पण, त्यांनी गर्दीत जाणे टाळावे अशी घोषणा अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केली आहे.
अमेरिकन प्रशासनाने जिथे गर्दी नसते, तेथे मास्कची सक्ती नसल्याची घोषणा केली आहे. अध्यक्ष बायडेन म्हणाले की, ज्या लोकांना लसी दिली गेली नाही, विशेषत: तरुण असल्याने आपल्याला लसीची गरज नाही असा विचार करत असल्यास. त्यांनी लस घ्यावी म्हणजे मास्क लावण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे सरकारला आता लसी देण्याचे चांगले कारण सापडले आहे.
अमेरिकेच्या सर्वोच्च सरकारी आरोग्य एजन्सीने अमेरिकन लोकांना लसीकरणाची पूर्णपणे माहिती दिली असून लसीनंतर ते मास्कशिवाय जगू शकतात. जर अमेरिकेत संपूर्ण लसीकरण केले गेले असेल तर कोरोना साथीमुळे थांबविलेल्या बर्याच गोष्टी करणे सुरू करणे शक्य होईल.परंतु ज्यांना सध्या मैफिलीमध्ये जायचे आहे किंवा एखादा खेळ बघायचा आहे त्यांच्यासाठी मास्क आवश्यक आहे. तसेच सिनेमा हॉल किंवा शॉपिंग करताना प्रत्येकाने मास्क घालणे आवश्यक आणि अनिवार्य आहे.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना टाळण्यासाठी लसीकरण करण्यापूर्वी मास्क परिधान करण्यास प्रभावी शस्त्र असल्याचे सांगितले. आजच्या काळात प्रत्येकाने मास्क घालण्याची गरज आहे. पण इस्त्राईल जगातील पहिला देश ठरला आहे जेथे मास्क न घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इस्राईलमध्ये ८१ टक्के लोकांना कोरोनाची लस दिली गेली असून त्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर येथे कोरोना संक्रमण आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही तीव्र घट झाली आहे.