मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही जर मारुती सुझुकीचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. कारण, कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या सेडान कारमध्ये तांभिक समस्या निर्माण झाल्याने मारुती सुझुकी कंपनीने या कार परत मागविल्या आहेत. मारुती सुझुकीची सेडान कार डिझायर एस टूर ही जर तुमच्याकडे असेल तर तातडीने तुम्हाला तुमच्या डीलरशी संपर्क साधावा लागणार आहे.
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. मारुती सुझुकीने आपल्या काही गाड्या परत मागवल्या आहेत. ही कार मारुती सुझुकी डिझायर एस टूर कार आहे. ही कार सेडन बॉडी टाईपमध्ये येत असून टूर व्हेरिएंट कॅबमध्ये ही कार मोठ्या संख्येने वापरली जाते. विशेष म्हणजे मागील वर्षी महिंद्रा अँड महिंद्रा या देशातील आघाडीच्या वाहन उत्पादक कंपनीने मात्र विक्रीस गेलेल्या त्यांच्या वाहनांमध्ये मोठा दोष आढळल्याने ऑगस्ट २०२१ मध्ये सुमारे ३० हजार वाहने परत मागविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वी जुलै २०२१ ही असाच काही वाहनांमध्ये दोष आढळल्याने सुमारे ६०० वाहने परत मागविण्यात आली होती.
ह्युंदाई मोटार कंपनीने देखील २६ हजारांहून अधिक वाहने त्यांच्या सदोष कार्यामुळे परत मागवली होती. विंडशील्डच्या समस्येमुळे कंपनीने ही वाहने परत मागवली आहेत. कंपनीने यूएसमधील सन २०२० आणि २०२१ ची एलांट्रा, सांता फे आणि सोनाटा सेडान मॉडेल्सच्या हजारो युनिट्ससाठी हे रिकॉल केले होते.
भारतातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुतीने डिझायर टूर एस सेडनच्या 166 युनिट्स परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानंतर कंपनी त्यात नवीन एअरबॅगचा समावेश करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित कार कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला तयार केल्या असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. प्रवाशांची सुरक्षा बघता या एअरबॅग्ज बदलणे आवश्यक असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. मारुती सुझुकी डिझायर एस टूर कार आहे. ही कार आपल्या अनेकदा ती ओला, उबेर किंवा इतर प्रकारच्या कॅब सेवांमध्ये दिसून आली असेल. वास्तविक, कंपनीने या रिकॉलमागे कारण सांगताना संबंधित कार्समध्ये एअरबॅगमधील दोष आढळल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कंपनीने या कार बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीकडून लावण्यात आलेल्या एअरबॅग सदोष असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कंपनी याप्रकरणी कुठल्याही प्रकारची जोखीम स्वीकारण्यास तयार नसल्याचे सांगण्यात आले आहे. कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत या एअरबॅग उघडणे कठीण होऊ शकते. त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
मारुती सुझुकी लवकरच सदोष कार मिळालेल्या कारच्या मालकांशी संपर्क साधून त्यांना कारमधील एअरबॅग्जबद्दल माहिती देईल. यासोबतच त्यांची बदली करण्याची प्रक्रियाही सांगण्यात येणार आहे. मारुती सुझुकी डिझायर एस टूरच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या कारची सुरुवातीची किंमत 6.05 लाख रुपये असून ती 7 लाख रुपयांपर्यंत जाते. तसेच या दोन्ही एक्स शोरूम किमती आहेत. मारुतीची ही कार सीएनजी व्हेरिएंटसह तीन प्रकारांमध्ये येते.
Maruti Suzuki Recall This Sedan Car Technical Problem
Dzire S Tour Airbag’s Automobile