इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मारुती सुझुकीने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर रिकॉल जारी केले आहे. यावेळी कंपनीने आपल्या सर्वाधिक पसंतीच्या प्रीमियम हॅचबॅकचे सात हजारांहून अधिक कार परत मागवले आहेत. या घोषणेमुळे सध्या ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मारुतीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने आपली प्रीमियम हॅचबॅक बलेनो परत मागवली आहे. बलेनोच्या आरएस (Baleno RS) व्हेरियंटचे ७२१३ युनिट्स कंपनीने परत मागवले आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ७२१३ युनिट्स परत मागवण्यात आल्या आहेत. बलेनोच्या आरएस व्हेरियंटच्या ब्रेक पेडलच्या व्हॅक्यूम पंपमध्ये दोष आढळला आहे. त्यानंतर कंपनीने रिकॉल जारी केले आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, बलेनो आरएस (Baleno RS) या व्हेरिएंटच्या २७ ऑक्टोबर २०१६ ते १ नोव्हेंबर २०१९ दरम्यान केले गेले. या आधी आणि नंतर बनवलेल्या गाड्यांमध्ये या प्रकारचा दोष नसल्यामुळे त्या परत मागवल्या गेल्या नाहीत. कंपनीने ही माहिती शेअर केली आहे. त्यानुसार ब्रेक पॅडलच्या व्हॅक्यूम पंपमध्ये बिघाड झाल्याची माहिती मिळाली आहे. मागील केसेसमध्ये, कारला ब्रेक लावताना ब्रेक पेडल अधिक जोराने दाबावे लागते. त्यामुळे ब्रेक लावताना त्रास होऊ शकतो.
ज्या ग्राहकांनी या कालावधीत कार खरेदी केली आहे कंपनीच्यावतीने फोन, संदेश आणि ई-मेलद्वारे माहिती दिली जाईल. याशिवाय जवळच्या शोरूम आणि सर्व्हिस सेंटरमधूनही त्यांना माहिती मिळू शकते. त्यानंतर एसयूव्हीला सर्व्हिस सेंटरमध्ये नेऊन तपासावे लागेल आणि त्यात काही दोष आढळल्यास कोणत्याही शुल्काशिवाय ती दुरुस्त केली जाईल.
याआधीही कंपनीने अनेक कारच्या हजारो युनिट्स परत मागवल्या आहेत. Baleno RS रिकॉल करण्यापूर्वी Brezza, Baleno, Alto K-10, Grand Vitara यासह इतर अनेक कारही परत मागवण्यात आल्या आहेत.
Maruti Suzuki Recall 7213 Car Model