मुंबई – मारुती सुझुकीने कंपनी भारतीय कार बाजारातील एसयूव्ही कार प्रकारात आपले वर्चस्व वाढवण्याच्या तयारीत आहे. त्याच एक भाग म्हणजे मारुती सुझुकी येत्या काही महिन्यांत भारतात किमान चार नवीन एसयूव्ही सादर करणार आहे. यामध्ये नेक्स्ट जनरेशन विटारा ब्रेझा आणि 5- डोअर जिमनीचा समावेश आहे. या नवीन वाहनांचा तपशील जाणून घेऊ या…
नेक्स्ट जनरेशन विटारा ब्रेझा
कंपनी पुढच्या वर्षी आपल्या हिट कॉम्पॅक्ट एसयूव्ही विटारा ब्रेझाची सेकंड ऐडीशन लॉन्च करणार आहे. ही एसयूव्ही हार्टक्ट प्लॅटफॉर्मच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. नवीन विटारा ब्रेझाचे डिझाईन सध्याच्या व्हेरिएंट सारखेच राहू शकते, परंतु यामध्ये, कंपनी 1.5 लीटर नैसर्गिक एस्पिरेटेड इंजिन चांगल्या हायब्रिड सिस्टीमसह ऑफर करणार आहे. याशिवाय, फॅक्टरी फिट सनरूफ, मोठी आणि प्रगत टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देखील यात दिसू शकतात.
फाईव्ह डोअर सुझुकी जिम्नी
कंपनी पुढील वर्षी हे वाहन भारतात लॉन्च करू शकते. 5-डोअर मारुती सुझुकी जिम्नी सिएरा वर आधारित असेल. या ऑफ-रोडर एसयूव्हीचा व्हीलबेस 300 मिमी मोठा असेल. मोठा व्हीलबेस आणि लांब केबिनच्या आत जास्त जागा मिळण्याची अपेक्षा आहे. ही SUV 1.5-लीटर K15B पेट्रोल इंजिनसह देण्यात येऊ शकते. हे इंजिन 100bhp पॉवर आणि 130Nm टॉर्क निर्माण करते. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टरचा पर्याय मिळू शकतो.
मारुती सुझुकी YTB
कंपनी सध्या नवीन सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीवर काम करत आहे. S-Presso आणि विटारा ब्रेझा दरम्यान कंपनी आणखी एक SUV लाँच करणार आहे. कंपनीच्या या आगामी सब-कॉम्पॅक्ट SUV चे नाव YTB आहे. ती बलेनो आणि स्विफ्टमध्ये दिसेल. मारुती सुझुकी YTB ची थेट स्पर्धा बाजारात नुकत्याच लॉन्च झालेल्या टाटा पंच कडून होऊ शकते. या SUV मध्ये कंपनी 1.2 लीटर 4-सिलेंडर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड इंजिन देऊ शकते. ही SUV पुढील वर्षी लॉन्च होण्याची शक्यता आहे.
मारुती-टोयोटाची एसयूव्ही
दोन्ही कंपन्या भारतीय बाजारात एकत्रपणे मध्यम आकाराची SUV लाँच करण्याची तयारी करत आहेत. आगामी SUV ची स्पर्धा Hyundai Creta, Kia Seltos, Skoda Kushak आणि MG Aster यांच्याशी असेल. ही SUV पुढील वर्षाच्या अखेरीस किंवा 2023 मध्ये बाजारात येऊ शकते.