पुणे – मारुती सुझुकीतर्फे न्यू जनरेशन सेलेरियो हॅचबॅक कारचे अनावरण करण्यात आले आहे. कारची डिलिव्हरी सुद्धा सुरू झाली आहे. नव्या २०२२ मारुती सेलेरियोसाठी अधिकृत बुकिंग ११ हजार रुपयांच्या टोकन रकमेवर सुरू झाली आहे. मारुतीच्या दाव्यानुसार, नवी सेलेरियो देशातील सर्वाधिक इंधन कुशल पेट्रोल कार आहे. ही नव्या 1.0L K10C K-Series डुअलजेट, डुअल VVT (वेरिएबल व्हॉल्व्ह टाइमिंग) पेट्रोल इंजिन आणि ५ स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स पर्यायांसह मिळेल.
पूर्वीपासूनच पावरफुल
नवी सेलेरियो पूर्वीपेक्षा पावरफुल असेल. मारुती सुझुकीने म्हटले आहे की, नवी सेलेरियोमध्ये नेक्स्ट जनरेशनच्या सीरिजमध्ये डुअल-जेट, डुअल व्हीव्हीटी इंजिन मिळणार आहे. या इंजिनासह मॅन्युअल आणि ऑटोमेटिक दोन गिअरबॉक्स मिळणार आहेत. तसेच मायलेज वाढविण्यासाठी आयडिअल स्टार्ट-स्टॉप फिचर देण्यात आले आहे.
सर्वाधिक मायलेज
भारतातील सर्वात मोठ्या कारनिर्माता कंपनीने यापूर्वीच दावा केला की, २०२१ सेलेरियो भारतातील सर्वाधिक इंधन कुशल पेट्रोल कार बनणार आहे. सुझुकीने सांगितले, की सेलेरियो २६ किमी प्रतिलिटर पर्यंत मायलेज देऊ शकेल. त्यामुळे ही कार भारतातील इतर कार निर्माता कंपन्यांच्या कारच्या तुलनेत जास्त इंधन वाचविण्यास कार्यक्षम बनवू शकेल.
व्हेरिएंट आणि रंग
नवी २०२१ मारुती सेलेरियो ४ ट्रिम्स- LXi, VXi, ZXi आणि ZXi+ तसेच ७ व्हेरिएंटसमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. ग्राहकांना खरेदी करण्यासाठी ६ रंगसंगतीचे पर्याय असतील. त्यामध्ये सिल्की सिल्व्हर, सॉलिड फायर रेड, आर्कटिक व्हाइट, कॅफिन ब्राउन, ग्लिस्टेनिंग ग्रे आणि स्पिडी ब्लू सारख्या रंगांचा समावेश आहे. पिढीमधील बदलांसह सेलेरियो हार्टेक्ट प्लॅफॉर्मवर आधारित आहे. हा बदल कारला पूर्वीच्या तुलनेत जास्त बळकट आणि कठोर बनवेल.
नवे फिचर्स
नव्या मारुती सेलेरियोमध्ये अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करणारे टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट स्क्रीन सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. तसेच आयडल स्टार्ट/ स्टॉप फंक्शन सह पुश स्टार्ट / स्टॉप बटन मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय कारमध्ये सेमीडिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर आणि मल्टि-स्पोक स्टिअरिंग व्हिल मिळण्याची पुष्टी करण्यात आली आहे.
कारच्या किंमती
नव्या सेलेरियोची किंमत ४.५० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. मागील सेलेरियोच्या पिढीला ४.६६ लाख रुपयांपर्यंत सादर करण्यात आले होते. तसेच टॉप-स्पेक ट्रिमच्या एक्स शोरूमची किंमत ६ लाखांपर्यंत जात होती. नव्या मॉडेलची किंमत जवळपास ५० हजार रुपये ते ६० हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.