मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्याच्या काळात कोणत्याही वाहनाने प्रवास करणे हे सोपे राहिलेले नाही, याला कारण म्हणजे पेट्रोल-डिझेल सारख्या इंधनाचे दर वाढल्याने त्याचा खिशाला चांगलाच भुर्दंड बसतो. सहाजिकच जास्त मायलेज देणार्या गाड्या घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. काही कंपन्यांनी अशा प्रकारच्या गाड्या लॉन्च करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यातच आता मारुती सुझुकीने पुढाकार घेतलेला दिसून येतो. विशेष म्हणजे मारुती सुझुकीची ही नवी गाडी खूपच चांगले मायलेज देत असून मुंबई ते नागपूर हे 830 किलोमीटर अंतर एकदा टाकी फुल केल्यावर पूर्ण होईल, तरी पेट्रोल संपणार नाही असे सांगण्यात येते.
पेट्रोलचे दर काहीसे कमी झाले असले तरी अद्याप ते अनेकांच्या बजेटच्या बाहेरच आहे. विशेषत: कारने लांब पल्ल्याचा प्रवास करण्याची वेळ येते, तेव्हा अनेकांचे बजेट बिघडते. तथापि, सध्या अशी एका कार बाजारात आली आहे की, तिचे मायलेज देशातील सर्व कारपेक्षा जास्त आहे. होय, मारुती सुझुकीची सेलेरियो एका लिटर पेट्रोलमध्ये 26.68 किमी मायलेज देते. इतकेच नाही तर त्याच्या CNG प्रकाराचे मायलेज 35.60 किमी आहे. म्हणजेच त्याच्या सीएनजी व्हेरियंटचे मायलेजही सर्वाधिक आहे. म्हणजेच ही गाडी चालवणाऱ्यांना पेट्रोलच्या दरात फारसा फरक पडणार नाही. त्याची एक्स-शोरूम किंमत 5.25 लाख रुपये आहे.
मारुती सेलेरियोमध्ये 32 लीटरची इंधन टाकी आहे. म्हणजेच, टाकी भरली तर 26.68 किमी नुसार, आपण 853Km प्रवास करू शकाल. म्हणजेच वाहनचालक मुंबईहून नागपूरला जात असेल किंवा नाशिकहून आग्रा येथे जात असेल तर रस्त्यात पेट्रोल भरण्याची गरज पडणार नाही. इतकेच नव्हे तर दिल्लीहून भोपाळला जात असाल तर वाटेत पेट्रोल टाकण्याची गरज भासणार नाही. कारण मुंबई नागपूर अंतर 830 किलोमीटर आहे तर दिल्ली ते भोपाळ अंतर 786 किमी आहे. त्याचप्रमाणे दिल्ली ते उदयपूर सुमारे 733 किमी, दिल्ली ते प्रयागराज सुमारे 742 किमी, दिल्ली ते श्रीनगर सुमारे 794 किमी अंतर एकदाच पूर्ण टाकी भरून करू शकाल.
नवीन सेलेरियो K10C DualJet ही तीन-पेट्रोल इंजिनद्वारे तयार केली आहे. ही स्टार्ट/स्टॉप सिस्टमसह येते. तसेच हे इंजिन 66 एचपी पॉवर आणि 89 एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच हे सध्याच्या मॉडेलपेक्षा 2 hp पॉवर आणि 1 Nm टॉर्क कमी जनरेट करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या कंपनीचा दावा आहे की, त्याचे मायलेज 26.68 kmpl आहे, सध्याच्या मॉडेलपेक्षा 23 टक्के जास्त आहे.
सेलेरिओला नवीन तेजस्वी फ्रंट ग्रिल, शार्प हेडलाइट युनिट आणि फॉग लाईट केसिंगसह 3D शिल्पित बाह्य बॉडी प्रोफाइल मिळेल. तसेच काळ्या अॅक्सेंटसह फ्रंट बंपर देखील नवीन आहे. त्यातील काही घटक एस-प्रेसोमधूनही घेतले आहेत. आउटगोइंग मॉडेलच्या तुलनेत कारचे साइड प्रोफाइल देखील पूर्णपणे वेगळे दिसते. यात नवीन डिझाइनसह 15-इंच अलॉय व्हील आहेत. मागील बाजूस, बॉडी कलरचे मागील बंपर, फ्लुइड लुकिंग टेललाइट्स आणि कर्व्ही टेलगेट मिळतात.
आता सेलेरियो कार ही बसण्यासाठी अधिक सिट किंवा जागा देणार आहे. कारच्या आत, फर्स्ट-इन-सेगमेंट हिल होल्ड असिस्ट, इंजिन स्टार्ट-स्टॉप, मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन यासारखी वैशिष्ट्ये उपलब्ध असतील. कारला शार्प डॅश लाइन्स, क्रोम अॅक्सेंटसह ट्विन-स्लॉट एसी व्हेंट्स, नवीन गीअर शिफ्ट डिझाइन आणि अपहोल्स्ट्रीसाठी नवीन डिझाइनसह केंद्र-केंद्रित व्हिज्युअल अपील मिळते. यात Apple CarPlay आणि Android Auto साठी सपोर्ट असलेला 7-इंचाचा स्मार्टप्ले स्टुडिओ डिस्प्ले आहे.
या कारमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, हिल होल्ड असिस्ट म्हणजे फर्स्ट-इन सेगमेंट अशी एकूण 12 सुरक्षा वैशिष्ट्ये मिळतील. या कंपनीचा दावा आहे की नवीन Celerio फ्रंटल-ऑफसेट, साइड क्रॅश आणि पादचारी सुरक्षा यासारख्या सर्व भारतीय सुरक्षा नियमांचे पालन करते. सॉलिड फायर रेड आणि स्पीडी ब्लू यासह आर्क्टिक व्हाइट, सिल्की सिल्व्हर, ग्लिस्टेनिंग ग्रे, कॅफीन ब्राउन, रेड आणि ब्लू यासह 6 रंगांमध्ये उपलब्ध असेल.