इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतात बहुतांश जण कार खरेदी करताना तिचा लूक आणि ती किती मायलेज देते याचा नक्कीच करतात. आपणही नवीन कार खरेदी करताना, लूक आणि परफॉर्मन्ससह ती किती मायलेज देते याकडे बरेच लक्ष दितो. सध्या देशात अशा अनेक कार्स आहेत, त्या चांगल्या मायलेजसाठी ओळखली जातात. सध्याच्या काळात भारतीय बाजारपेठेत अनेक नवनवीन अत्याधुनिक आणि आकर्षक प्रकार दाखल होत आहेत, मात्र त्यातही ग्राहकांची पसंती विशिष्ट कारलाच मिळत असल्याचे दिसून येते. त्यापैकी हॅचबॅक कार भारतात सर्वाधिक विकल्या जातात. कारण त्या किमतीत किफायतशीर आहेत, तसेच आपल्या कुटुंबासाठी योग्य पर्याय आहेत.
मारुती सुझुकीने नुकतीच ग्रँड व्हिटारा सादर केली आहे. तर त्याआधी काही दिवस न्यू ब्रेझा ही गाडी लाँच करण्यात आली होती. या दोन्ही गाड्यांचे ऑनलाइन बुकिंग सुरू आहे. ग्राहकांना या दोन्ही SUV गाड्या खूप आवडल्या आहेत. ग्रँड व्हिटारा आणि न्यू ब्रेझा या दोन्ही एसयूव्हींचे आत्तापर्यंत एक लाखांहून अधिक बुकिंग झाले आहे.
आता पर्यंत ग्रँड व्हिटारा गाडीची 26 हजारांपेक्षा जास्त युनिट्स बूक झाली आहेत. तर 75 हजारांपेक्षा अधिक लोकांनी न्यू ब्रेझा ही गाडी बूक केली आहे. दोन्ही गाड्या मिळून मारूती कंपनीला आत्तापर्यंत 1 लाखाहून अधिक युनिट्सची ऑर्डर मिळाली आहे. अजूनही दररोज दोन्ही गाड्यांसाठी जोरदार बुकिंग सुरूच आहे. 21 जून पासून न्यू ब्रेझा या गाडीचे तर 11 जुलै पासून ग्रँड व्हिटारा गाडीचे बुकिंग सुरू झाले होते.
मारुती सुझुकीने या दोन्ही गाड्यांच्या बळावर भारतीय बाजारात या सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. ग्राहकांनाही या दोनही गाड्या खूप आवडल्या असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अवघ्या तीन आठवड्यांमध्ये ग्रँड व्हिटारा गाडीच्या बुकिंगचा आकडा 20 हजारांपार पोचला आहे. ही नवी एसयूव्ही 11 हजार रुपयांमध्ये बूक करता येऊ शकते. या गाडीची किंमत अंदाजे 9.5 लाख रुपये ( एक्स- शो रूम) आहे. त्यामध्ये कंपनी व्हेंटिलेटेड सीट, मल्टीपल ड्रायव्हिंग मोड असे फीचर्स देण्यात आले आहेत. ग्रँड व्हिटारा मिड साईज एसयूव्ही (SUV)ही मारुती सुझुकीची अशी पहिली कार आहे, ज्यामध्ये हायब्रिड इंजिन आहे.
मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ कार्यकारी अधिकापी शशांक श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रँड व्हिटाराच्या मजबूत हायब्रिड इंजिन व्हेरिएंटबद्दल लोकांच्या मनात रस दिसून येत आहे. ग्रँड व्हिटाराच्या बुकिंगपैकी निम्मे प्री-बुकिंग हे हायब्रिड व्हेरिएंट कारचे झाले आहे.
Maruti Suzuki Car SUV Demand 1 Lac Car Booked