ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही जर सीएनजी कारच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी हे वृत्त महत्त्वाचे आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमती आणि कारचा मायलेज हे संतुलन सांभाळणे कठीण होते. त्यामुळे आपण सर्वाधिक मालयेज देणाऱ्या मारुती सुझुकीच्या बेस्ट सीएनजी कार कोणत्या हे जाणून घेणार आहोत…
सेलेरिओ
सीएनजीचे मायलेज 35.60 किमी/किलो आहे. व्हीएक्सआय ट्रिममध्ये मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजीची एक्स-शोरूम किंमत 6.7 लाख रुपये आहे. मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजीमध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे 56 bhp आणि 82 Nm टॉर्क निर्माण करते. यात 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे.
वॅगनआर
सीएनजीचे मायलेज 34.05 किमी/किलो आहे. मारुती सुझुकी वॅगनआर सीएनजी LXi आणि VXi ट्रिममध्ये येते. या कारच्या किंमती 6.34 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होतात. यात 998 cc, 3 सिलिंडर इंजिन आहे. यात 5- स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देखील मिळतो.
अल्टो 800
सीएनजी 31.59 किमी/किलो मायलेज देते. भारतातील ही सर्वात स्वस्त सीएनजी ऑफर आहे. मारुती सुझुकी अल्टो 800 सीएनजीची किंमत 5.03 लाख रुपयांपासून सुरू होते. याला 0.8 लीटर इंजिन मिळते, जे 40 bhp पॉवर आणि 60 Nm टॉर्क जनरेट करते. यात मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो.
स्विफ्ट डिझायर सेडान
सीएनजीचे मायलेज 31.12 किमी/किलो आहे. मारुती सुझुकी डिझायर सीएनजी VXi आणि ZXi ट्रिममध्ये ऑफर केली जाते. कारचे इंजिन 76 bhp पॉवर आणि 98 Nm टॉर्क जनरेट करते. हे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह देखील येते. कारची एक्स-शोरूम किंमत 8.14 लाख रुपये आहे.
स्विफ्ट
सीएनजी नुकतेच भारतात लॉन्च करण्यात आली, ज्याची किंमत 7.77 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. स्विफ्ट सीएनजी VXi आणि ZXi ट्रिममध्ये ऑफर केली जाते आणि 30.9 किमी/किलो मायलेज देते. कारमध्ये 1.2-लिटर इंजिन आहे, जे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
Maruti Suzuki Best CNG Cars Top Mileage
Automobile Fuel Efficient