पिंपळगाव बसवंत: पिंपळगाव शहरातील जोपूळरोड शिवारात वायरींगमध्ये झालेल्या बिघाडामुळे मारुती व्हॅनने अचानक पेट घेतला. येथील अग्निशमन विभागाच्या कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
पिंपळगाव बसवंत शहरातील जोपूळ शिवारातील कपिल खोडे यांची मारुती व्हॅन क्रमांक एमएच १५ सि एम ८६९० ही गेल्या चार ते पाच दिवसापासून घरी उभी असल्याने उंदराने वाहनातील वायरींग कुडतली, ही बाब खोडे यांच्या लक्षात न आल्याने पिंपळगावकडून जोपुळरोडवरून जात असताना चालत्या मारुती व्हॅन कारममधून धूर येऊ लागला.
वायरींगमध्ये झालेल्या बिघाडामुळे गॅस, व पेट्रोलने अचानक पेट घेतल्याने .स्थानिकांनी याबत तातडीने येथील अग्निशमन विभागास माहिती दिली.अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काही क्षणात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी मारुती व्हॅनचे पूर्णपणे जळून खाक होत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन विभागाचे कर्मचारी विनायक गवांदे, वसंत काळे,रवींद्र बैरागी आदि उपस्थित होते.