सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
लासलगाव कोटमगाव बसवंत रस्त्यावर असलेल्या कोटमगाव परिसरात बुधवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान मारुती ओमनी गाडीने अचानक पेट घेतल्याने संपूर्ण गाडी जळून खाक झाली. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.
लासलगाव येथील रशीद शेख यांच्या मालकीची मारुती ओमनी गाडी नंबर एम एच १५ १८६३ कोटमगाव येथून टाकळी विंचूरकडे जात असताना या गाडीने अचानक पेट घेतला. सुदैवाने वाहन चालकाने गाडीखाली उतरत आपला जीव वाचवला. या अपघातात संपूर्ण गाडी जळून खाक झाली आहे. घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मारुती ओमनी पेटण्याचे कारण काय याबाबत चौकशी सुरू केली आहे.