विशेष प्रतिनिधी, मुंबई
मारुती सुझुकी एरिना डिलरशीपवर जून महिनाभर डिस्काऊंटचा पाऊस पडणार आहे. या डिलरशिपच्या माध्यमातून कंपनी आल्टोसह, वॅगनआर, व्हिटारा ब्रेझा आणि स्विफ्टसारख्या मॉडेल्सची विक्री करते. आफरअंतर्गत ग्राहकांना कॅश डिस्काऊंट, एक्स्चेंज बोनस आणि कॉर्पोरेट सवलती दिल्या जात आहेत. केवळ ३० जूनपर्यंत या आफर्स असणार आहेत.
Maruti Alto : मारुती आल्टोच्या पेट्रोल मॉडेलवर ग्राहकांना ४१ हजार रुपयांपर्यंतची सवलत मिळणार आहे. यात २० हजार रुपये कंझ्युमर आफर, १५ हजार रुपयांपर्यंतचे एक्स्चेंज बोनस, ३ हजार रुपयांपर्यंतचा कार्पोरेट डिस्काऊंट आणि ३ हजार रुपयांची अतिरिक्त सवलत सामील आहे. याची किंमत २ लाख ९९ हजार ते ४ लाख ६० हजार रुपयांपर्यंत आहे.
Maruti S-Presso : मारुती एस-प्रेसोवरही आल्टोप्रमाणेच ४१ हजार रुपयांपर्यंतच्या सवलती देण्यात आल्या आहेत. या गाडीची किंमत ३ लाख ७८ हजार ते ५ लाख २६ हजार रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
Maruti Eeco : मारुती कंपनीची ही गाडी ७ सीटर असून पेट्रोल आणि सीएनजी या दोन्हींमध्ये उपलब्ध आहे. विशेष म्हणजे दोन्हींमध्ये ३१ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट मिळणार आहे. या गाडीची किंमत ४ लाख ८ हजार ते ५ लाख २९ हजार रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
Maruti Celerio : मारुती सिलेरियो कारवर २१ हजार रुपयांची सवलत आहे. यात कंझ्युमर आफर सामील करण्यात आलेले नाही. ही गाडी पेट्रोल आणि सीएनजी या दोन्हींमध्ये उपलब्ध आहे. गाडीची किंमत ४ लाख ६५ हजार ते ५ लाख ९० हजार रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.









