इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या देशात कोणत्याही प्रांतात लग्न समारंभ असो, सध्याच्या काळात लग्न किंवा विवाह प्रसंगी मद्यपान किंवा दारूकाम ही फॅशन किंवा झाली आहे. त्यातच दारू पिऊन वरातीत धिंगाणा करणे ही जणू काही प्रथाच बनली आहे, मात्र त्यामुळे लग्नात विघ्न येऊ शकते असाच गैरप्रकार उत्तर प्रदेशात एका लग्नप्रसंगी घडला. आणि अखेर वराला अटक होऊन हा विवाह देखील मोडला.
उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यात लग्न मिरवणुकीत एकच गोंधळ झाला. कारण आग्रा नजिक खंडौली येथून रात्री निघालेल्या मिरवणुकीत काही वऱ्हाडीनीं मद्यधुंद अवस्थेने गोंधळ घातला. त्यामुळे वधू पक्ष एक होत वर पक्षाला मारहाण करत असल्याचे पाहून मिरवणुकीत पळापळ झाली. त्यातच वधूपक्षाने वराला, त्याचे वडील आणि नातेवाईकांना ओलीस म्हणजे कोंडून ठेवले. तसेच सकाळी पोलीसांचा फोन आल्यावर वराला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. दोन तासांनंतर दोन्ही पक्षांच्या संमतीने संबंध तोडून एकमेकांचे सामान परत केले. यानंतर वऱ्हाडी व नातेवाईक परतले. याबाबत या घटनेची सविस्तर माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, खंडौली हद्दीतील नागला नाठे गावात एका कुटुंबाची विवाह मिरवणूक आली होती. वाजतगाजत ही मिरवणूक वधूपक्षाच्या दारात पोहोचली. मात्र दारूच्या नशेत वहाडी मंडळी नाचत होते. वधूच्या मामाने मिरवणूक अडवून चार जणांना बेदम मारहाण केली. ही वार्ता पसरताच वधू पक्षाचे सर्व नातेवाईक व ग्रामस्थ एकवटले आणि प्रकरण आणखी वाढले. ग्रामस्थांचा संताप पाहून मिरवणुकांची पळापळ झाली.
यानंतर वधूच्या बाजूने या लग्नास नकार दिला गेला, पुन्हा दोन्ही बाजूंमधील वाद वाढत गेला. वधूच्या बाजूने वराला, त्याचे वडील आणि त्याच्यासोबत राहिलेल्या नातेवाईकांना रात्रभर ओलीस ठेवल्याचा आरोप आहे. त्यानंतर लग्न मोडण्याची तयारी करूनही वराला कोंडलेल्या खोलीतून उठू दिले नाही. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वराने पोलीस ठाण्यात मोबाईलवरून फोन करून त्याला ओलीस ठेवल्याची माहिती दिली. यावर पोलीस अधिकारी हे फौजफाट्यासह आले आणि त्यांनी वराला व त्याच्या बाजूने पोलिस ठाण्यात आणले. यानंतर दोन्ही पक्षांनी लग्नाचे सामान व दोन्ही पक्षांचे सामान परत देण्याचे मान्य केले. पोलीसांनी आणखी सांगितले की, दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला होता. यानंतर संमतीने विवाह संबंध तोडले. अद्याप दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल केलेली नाही. मात्र मुहूर्तावर लग्न मोडल्यानंतर वधू-वरांच्या बाजूने अन्यत्र लग्नासाठी प्रयत्न सुरू झाले. दोन्ही बाजूंनी तयारी पूर्ण झाली असून एक-दोन दिवसांत दोघांचे वेगवेगळ्या ठिकाणी लग्न होईल, असे सांगितले जाते.