अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
कळवण तालुक्यात जोरदार पाऊस होत असून वणी -कळवण -मुळाणेमार्गे असलेल्या घाट रस्त्यावर दरड कोसळ्याची घटना घडली आहे.काही दिवसा पुर्वी येथे याच ठिकाणी ट्रॅक्टर आपघात झाला होता.त्याच ठिकाणी दरड कोसळली आहे.
वणी पासुन जवळ असलेल्या बाबापुर गावा जवळ असलेल्या मार्कंडबारीत दरड कोसळल्याने वाहतुक बंद झाली आहे. आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास या मार्क॔डबारीत दरड कोसळली मोठमोठी दगड व झाडे रस्त्यावर कोसळले आहे. सुदैवाने यावेळी येथे कोणीच नव्हते त्यामुळे हानी टळली. बाबापुर येथील तरुणांनी येथे रस्त्यावरील दगड चिखल बाजु केला आहे. सलग दोन दिवसा पासून होत असलेल्या पावसाने सर्वत्र नदीनाले ओसंडून वाहत आहे. येथील तरुण धनराज गांगोडे,किरण गायकवाड, संतोष पालवी व त्यांचे सहकारी होते. प्रशासनाला याची माहिती कळवण्यात आली आहे.