नवी दिल्ली – ‘नावात काय आहे?’असे म्हटले जाते, परंतु ‘नावातच सर्व काही आहे’, असेही बोलले जाते. अनेक शहरे, व्यक्ती किंवा गावांची नावे बदलतात. परंतु आता जगातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय कंपनीचेच नाव बदलले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकने आपले नाव बदलले आह. फेबसुकचे नवे नाव आता मेटा असेल अशी घोषणा कंपनीचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी केली आहे.
कंपनीच्या कनेक्ट व्हर्च्युअल रिअॅलिटी कॉन्फरन्समध्ये मार्क झुकरबर्गने सांगितले की, आम्हाला आता नवीन कंपनी ब्रँड स्वीकारण्याची वेळ आली आहे, त्यामध्ये आम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा समावेश आहे. झुकरबर्ग पुढे म्हणाले की, आता आपण कंपनी फेसबुक नव्हे तर मेटाव्हर्स बनणार आहोत. झुकरबर्ग यांनी जुलैमध्ये एका कॉलमध्ये सांगितले होते की, कंपनीचे भविष्य ‘मेटाव्हर्स’मध्ये आहे. Facebook हे अल्फाबेट इंक सारखी होल्डिंग कंपनी लक्ष्य करत आहे. या अंतर्गत Instagram, WhatsApp, Oculus आणि Messenger सारख्या अनेक सोशल नेटवर्किंग अॅप्स चालविले जात आहेत.
गेल्या आठवड्यात फेसबुकने सांगितले की, मेटाव्हर्स तयार करण्यात मदत करण्यासाठी पुढील पाच वर्षांमध्ये युरोपियन युनियनमध्ये 10 हजार युजर्स नागरिकांना नियुक्त करण्याची योजना आहे. Metaverse – एक नवीन ऑनलाइन जग असून जिथे युजर्स अस्तित्वात आहेत. आणि ते सामायिक केलेल्या आभासी जागेत संवाद साधतात.
फेसबुकने व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर) मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्याचे जवळपास तीन अब्ज वापरकर्ते एका पेक्षा अधिक डिव्हाइसेस आणि अॅप्सवर कनेक्ट करण्याचा त्यांचा मानस आहे.