रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

दर दोन वर्षांनी राज्यातील निरनिराळ्या शहरांमध्ये विश्व मराठी संमेलन भरवणार; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

जानेवारी 4, 2023 | 6:39 pm
in संमिश्र वार्ता
0
4 1140x760 1

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – “विश्व मराठी संमेलनास राज्य शासन पूर्ण पाठबळ देईल आणि दर दोन वर्षांनी राज्यातील निरनिराळ्या शहरांमध्ये हे संमेलन भरविण्यात येईल”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ‘मराठी तितुका मेळवावा’ या पहिल्या विश्व मराठी संमेलनाचे आज मुंबई येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया, वरळी येथे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार राहुल शेवाळे, खासदार हेमंत पाटील, आमदार आशिष शेलार, यामिनी जाधव, प्रकाश सुर्वे, मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव मनिषा पाटणकर-म्हैसकर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आदि मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, “मुंबईमध्ये मराठी माणसाला ताठ मानेने जगता आले पाहिजे. मराठी माणूस या मुंबईमधून बाहेर जाता कामा नये. मुंबईतून बाहेर गेलेल्या मराठी माणसालादेखील मुंबईत परत कसे आणता येईल, यासाठी देखील प्रयत्न करण्यात येतील. आज मुंबईतले हे विश्व संमेलन खऱ्या अर्थाने आपल्या मराठी माणसांना एकत्र आणण्याची एक सुरुवात आहे”.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, “जी भाषा सर्वांना जोडते, जी भाषा सर्वांना सामावून घेते आणि जी भाषा जात, धर्म, पंथ पलिकडची माणुसकी शिकवते, माणुसकी जपते, तीच भाषा खऱ्या अर्थाने विश्वाची बनते आणि हे सर्व गुण आपल्या मराठी भाषेमध्ये अगदी ठासून भरलेले आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर देण्यात यावा, यासाठी केंद्राकडे देखील पाठपुरावा करण्यात येत आहे. मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, तसेच मराठी साहित्य संमेलनाच्या अनुदानाच्या रकमेमध्ये वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक आहे”.

“मराठी माणूस आपल्या कर्तृत्वाने आज जगभरामध्ये सगळीकडे यशाची शिखरं गाठतोय आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये आपण गेलो तरी मराठी भाषा कानावर पडते. या सर्व मराठी माणसांना एकत्र आणणारा दुवा म्हणून हे विश्व मराठी संमेलन आहे. मराठी भाषा आणि आपले सण, उत्सव जगभरातील मराठी माणसांना एकत्र जोडून ठेवतात, त्यामुळे गणेशोत्सव साजरा केल्याशिवाय आपल्या मराठी बांधवांना चैन पडत नाही. गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये कोरोनामुळे सगळे कामकाज ठप्प होते. आता सगळे सुरू झाले आहे, सर्व सण आपण आनंदाने एकत्रितपणे साजरे करत आहोत”, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

मराठी ज्ञानभाषा व्हावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
“उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेचे शिक्षण हे आपल्या मातृभाषेमध्ये होत नाही, तोपर्यंत आमच्या भाषा या वैश्विकभाषा होऊ शकणार नाही, मराठी ही ज्ञानभाषा होणे आवश्यक आहे”, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी, नवीन शैक्षणिक धोरणात उच्च शिक्षण राज्याच्या भाषेत तयार करण्याचे सर्व राज्यांना आवाहन केले. महाराष्ट्राने त्यानुसार काम सुरू केले असून त्यात आघाडी घेतली आहे. मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचे काम राज्य शासन करीत आहे”.

“जगातल्या सर्व मराठी भाषिकांना एकत्रित आणण्याचे काम या संमेलनाच्या माध्यमातून होत आहे”, असे सांगून “जगातल्या विविध भाषांतील साहित्य मराठीमध्ये अनुवादित झाले आहे. मात्र मराठीतील साहित्य हे जगाच्या विविध भाषांत अनुवादित होऊ शकले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच रशिया येथे अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर आयोजित संमेलनास उपस्थित राहिल्याची आठवणही त्यांनी सांगितली.

केवळ साहित्य क्षेत्रातच नव्हे तर उद्योग क्षेत्रातही मराठी उद्योजक पुढे असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, येत्या काळामध्ये मराठी माणूस उद्योगाच्या स्टार्टअपच्या, टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर पाहायला मिळेल आणि एक अतिशय चांगली इकोसिस्टीम राज्यात तयार करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
“महाराष्ट्र उद्योगांमध्ये क्रमांक एकवर होता, क्रमांक एकवर पुन्हा आम्ही त्याला आणतो आहोत आणि भविष्यात देखील तो क्रमांक एक वरच राहील,” असा विश्वास श्री.फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

मुंबईतून मराठी हद्दपार होणार नाही – मंत्री दीपक केसरकर
यावेळी बोलतांना मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर म्हणाले, “मुंबई म्हणजे मराठीची राजधानी आहे. येथे मराठी भाषा टिकली पाहिजे. मुंबईतून मराठी हद्दपार होणार नाही, हा शासनाचा निर्धार आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार वैश्विक स्तरावर होण्यासाठी ‘मराठी तितुका मेळवावा’ या उदात्त हेतूने मराठी भाषा विभागामार्फत मुंबईत विश्व संमेलन आयोजित करण्यात आले आहे”.
“मुंबईतील मरीन लाईन्स येथे मराठी भाषा भवन होणार असून तेथे मराठी भाषा विभागाची सर्व कार्यालये एका छताखाली असणार आहोत.

“मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आम्ही सर्व पुरावे विभागामार्फत केंद्र सरकारकडे सादर करणार आहोत. या संमेलनाच्या माध्यमातून परदेशस्थ मराठी उद्योजकांना प्रोत्साहित करणे, तसेच त्यांच्यापैकी ज्या उद्योजकांना महाराष्ट्रामध्ये उद्योग सुरु करावयाचा असेल किवा भांडवली गुंतवणूक करायची असेल त्या उद्योजकांना योग्य ती शासकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे”, अशी माहिती श्री.केसरकर यांनी यावेळी दिली .
प्रास्ताविक मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर म्हैसकर यांनी केले तर राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील यांनी आभार मानले.

क्षणचित्रे
– परदेशातील ४९८ मराठी मंडळांतील प्रतिनिधी, ६२ परदेशस्थ उद्योजक, परराज्यातील ४७० बृहन्महाराष्ट्र मंडळाचे प्रतिनिधी, १६४ राज्यातील नामवंत साहित्यिक संमेलनासाठी उपस्थित लेझिम पथकांकडून उपस्थित मान्यवरांचे वाजत गाजत स्वागत.
– संपूर्ण परिसरात मराठी पेहराव केलेल्या देश विदेशातून आलेल्या मराठी प्रेमींची गर्दी
– मराठी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या जात्यावरच्या ओव्या, रांगोळीने समजलेले तुळशी वृंदावन, खलबत्ता वापरत असणाऱ्या मराठी गृहीणींचे देखावे.
– पुस्तक विक्रीसाठी वेगवेगळी दालने
– खानदेशी, वऱ्हाडी, मराठवाडा, कोकणी अशा विविध भागातील खाद्यपदार्थांचा जेवणात समावेश.

Marathi Vishwa Marathi Sammelan CM Eknath Shinde

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ईडीचा मोठा दणका! माजी मंत्री अनिल परब यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त; ठाकरे गटाला धक्का

Next Post

पत्नीची निर्घृण हत्या करणा-या पतीला न्यायालयाने दिली जन्मठेपेची शिक्षा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
court 1

पत्नीची निर्घृण हत्या करणा-या पतीला न्यायालयाने दिली जन्मठेपेची शिक्षा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011