मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टीव्ही वाहिन्यावर अनेक मालिका तथा शो सादर होत असतात. परंतु काही कार्यक्रम हे प्रेक्षकांचे अत्यंत आवडीचे बनतात त्यापैकीच एक म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ होय. घराघरात हा कार्यक्रम अत्यंत आवडीने पाहिला जातो. याला कारण म्हणजे त्यामध्ये रसिक प्रेक्षकांचे होणारे निखळ मनोरंजन आणि उडणारे हास्याचे फवारे होय. महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम फार लोकप्रिय म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमातील समीर चौगुले, विशाखा सुभेदार, निखिल बने, नम्रता संभेराव यासारखे अनेक विनोदवीरांचे निखळ मनोरंजन करत आहेत. आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसायला लावणारी अभिनेत्री म्हणून अभिनेत्री विशाखा सुभेदारला ओळखले जाते.
https://twitter.com/sonymarathitv/status/1557049070602051589?s=20&t=kl9c2QV9hxtWn-emQaQMiQ
सोनी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे तिला घराघरात प्रसिद्धी मिळाली. तिच्या विनोदी बुद्धीमुळे तिने जवळपास ४ वर्षांहून अधिक काळ या कॉमेडी शोमध्ये काम केले. लवकरच महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे नवे पर्व सुरु होणार आहे. मात्र या पर्वातही विशाखा सुभेदार झळकणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम २०१८ पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाचे नवे पर्व येत्या १५ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा – चार वार हस्याचा चौकर’, असे या नव्या पर्वाचे नाव आहे. यात नक्की काय नवीन असणार याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र लवकरच हे गुपित उलगडणार आहे. या नव्या पर्वात समीर चौगुले, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, ओंकार भोजने, गौरव मोरे आणि इतर कलाकार दिसणार आहेत.
https://twitter.com/sonymarathitv/status/1557026418390814721?s=20&t=kl9c2QV9hxtWn-emQaQMiQ
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रमाचे नवे पर्व लवकरच सुरू होणार असून यात नक्की काय नवीन असणार याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र लवकरच हे गुपित उलगडणार आहे. काही महिन्यांपूर्वी विशाखा सुभेदारने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला होता. तिने फेसबुक पोस्ट लिहित यामागचे कारण सांगितले होते. त्यानंतर अनेक प्रेक्षकांना धक्का बसला होता. मात्र ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या पुढच्या पर्वात विशाखा पुन्हा दिसू शकते असे सांगितले जात होते. मात्र विशाखा सुभेदार ही या नव्या पर्वाचा भाग नसणार आहे. विशाखा सुभेदार ही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या नव्या पर्वात सहभागी होणार नाही. कारण तिने या कार्यक्रमाला कायमचा रामराम केला आहे. त्यामुळे ती या कार्यक्रमाच्या नव्या भागात झळकणार नाही. पण तिच्याऐवजी या कार्यक्रमात अनेक विनोदी कलाकार पाहायला मिळणार आहे.
https://twitter.com/sonymarathitv/status/1556664027559866369?s=20&t=kl9c2QV9hxtWn-emQaQMiQ
काही दिवसांपूर्वी या मालिकेने ५०० भागांचा टप्पा पूर्ण केला. या निमित्ताने मोठे सेलिब्रेशनही करण्यात आले होते. ५०० नव्हे तर ५००० भाग पूर्ण होतील अशा शुभेच्छा या मालिकेला प्रेक्षकांनी दिल्या. मात्र त्यानंतर विशाखा सुभेदार ही मालिका सोडत असल्याची बातमी प्रेक्षकांना मिळाली आणि त्यांना धक्काच बसला. यावेळी तिने एक फेसबुक पोस्टही शेअर केली होती.
https://twitter.com/sonymarathitv/status/1556571886410035200?s=20&t=kl9c2QV9hxtWn-emQaQMiQ
Marathi TV Show Maharashtrachi Hasya Jatra Actress Exit
Vishakha Subhedar Sony Marathi TV Serial Entertainemnt