इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांसाठी विरंगुळा असतो. त्यामुळेच या मालिकांना प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळते. या मालिकांमधील घटना प्रेक्षक आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडत असतात. या मालिकांच्या जगात दररोज काही न काही नवीन घडत असत. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या झी वाहिनीवरील मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेतील यश म्हणजेच श्रेयस तळपदे आणि नेहा म्हणजे प्रार्थना बेहरे यांच्यावर प्रेक्षकांचा फारच जीव आहे. छोटी परी अर्थात मायरा तर घराघरातील मोठ्यांच्या गळ्यातील ताईतच झाली आहे. सध्या मालिकेत एक वेगळा ट्रॅक सुरू आहे. यश आणि नेहाच्या गाडीला अपघात झाला आहे. या जीवघेण्या संकटातून यश तर वाचला आहे, पण नेहा अजूनही बेपत्ता असल्याचं दाखवलं आहे.
सगळेजण नेहाचा शोध घेत आहेत मात्र ती कुठेच सापडत नाही. नव्या भागात तिला मृत म्हणून घोषित करण्यात आले आहे. मालिकेने घेतलेल्या या वळणामुळे प्रेक्षक नाराज आहेत. म्हणूनच कदाचित आता मालिकेत नेहाची नव्याने एंट्री होणार आहे. एका नव्या रूपात ती आपल्याला दिसण्याची शक्यता आहे. झी वाहिनीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर नेहाचे म्हणजे अभिनेत्री प्रार्थना बेहरेचे नव्या रुपातले फोटो शेअर केले आहेत. त्यावरील कॅप्शनमुळे हे प्रश्न सुरू झाले आहेत. ही ‘नेहा की दुसरी कोण’? या कॅप्शनमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रार्थना नुकतीच ‘बस बाई बस’ या कार्यक्रम आली होती.
आईच्या आठवणीत परी होणार भावुक.
'माझी तुझी रेशीमगाठ',
22 ऑक्टोबर, शनि, संध्या. 6.30 वा.#MajhiTujhiReshimgath #ZeeMarathiआता तुमची आवडती मालिका कधीही कुठेही पाहण्यासाठी https://t.co/9q8IXyfdUG या लिंकवर क्लिक करा. pic.twitter.com/ci6tZoYxGN
— Zee Marathi (@zeemarathi) October 21, 2022
या कार्यक्रमात तिने अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला. तिच्या हसण्यापासून ते वैभव तत्त्ववादी बरोबरच्या लग्नाच्या चर्चांवर तिने स्पष्टीकरण दिले आहे. प्रार्थनाने अभिषेक जावकरशी २०१७ साली लग्नगाठ बांधली. प्रार्थना मूळची बडोद्याची आहे, अभिनयात करियर करण्यासाठी तिने मुंबई गाठली. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमधील नेहा कामत या प्रार्थनाच्या भूमिकेला प्रेक्षकांची अधिक पसंती मिळत आहे. तिच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. म्हणूनच कदाचित मालिकेत तिला नव्या रुपात प्रेक्षकांपुढे आणतील अशी शक्यता आहे. येत्या काही दिवसात हे आपल्यासमोर येईलच.
ही नेहा की दुसरी कोण???
'माझी तुझी रेशीमगाठ',
सोम – शनि, संध्या. 6.30 वा.#MajhiTujhiReshimgath #ZeeMarathi pic.twitter.com/0t8FwYQQ6a— Zee Marathi (@zeemarathi) October 21, 2022
Marathi TV Serial Will Neha Return or not
Majhi Tujhi Reshimgath Zee Marathi Entertainment Prarthana Behere